एक्स्प्लोर
62 पुरस्कार पटकावणाऱ्या 'स्कॉटलॅन्ड' चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन
बॉलिवूडचा चित्रपट 'गली बॉय' ऑस्कर्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर फिल्म मेकर मनीष वात्सल्यचा 'स्कॉटलॅन्ड' या चित्रपटाने यंदा बेस्ट फिचर फिल्म या कॅटगरीमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ऑस्कर्समध्ये नामांकन मिळण्याआधी या चित्रपटाने 62 पुरस्कार पटकावले आहेत.
मुंबई : चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठेचा पुरस्कार सोहळा म्हणजे, ऑस्कर. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्याची यादी आली आहे. बॉलिवूडचा चित्रपट 'गली बॉय' ऑस्कर्सच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. तर फिल्म मेकर मनीष वात्सल्यचा 'स्कॉटलॅन्ड' या चित्रपटाने यंदा बेस्ट फिचर फिल्म या कॅटगरीमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. ऑस्कर्समध्ये नामांकन मिळण्याआधी या चित्रपटाने 62 पुरस्कार पटकावले आहेत.
दिग्दर्शक मनीष वात्सल्य यांच्या 'स्कॉटलॅन्ड' या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा असून आतापर्यंत 62 पुरस्कार आपल्या नावे करणारा हा चित्रपट ऑस्करमध्ये आपली छाप सोडणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर जॉनरचा चित्रपट आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलायचें झालं तर, हा चित्रपट मुलींवर होणाऱ्या बलात्कार आणि हत्येवर अवलंबून आहे. या चित्रपटाची कथा काल्पनिक नसून ती एका सत्यघटनेवर आधारित आहे.
पाहा ट्रेलर :
चित्रपटाबाबत बोलायचं झाले तर, या चित्रपटात एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात येते. पीडित मुलीचे वडिल आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी कायदा आपल्या हातात घेतात. या चित्रपटात अदम सैनी, खूशबू पुरोहित, मनीष वात्सल्य, चेतन पंडित आणि दया शंकर पांडे मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, अदम सैनी यांना या चित्रपटासाठी सात वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसेच या चित्रपटाची कथा अदम सैनी याने लिहिली असून स्क्रीनप्ले आणि संवाद पियूष प्रियांक यांनी लिहिले आहेत.
संबंधित बातम्या :
66th National Film Award : कीर्ती सुरेश सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर, विकी कौशल सर्वोत्कृष्ट अभिनेता
सलमान खान WWE चॅम्पियन होणार, चॅम्पियनशिप बेल्टसुद्धा मिळणार
सिम्पल लूकमध्ये 'पंगा' घेणार कंगना, पाहा आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक
'बंटी और बबली 2'ची शुटिंग सुरू, 11 वर्षांनी एकत्र दिसणार सैफ अली खान आणि राणी मुखर्जी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement