Rozlyn Khan : अभिनेत्री रोजलिन खानला कॅन्सर; म्हणाली,"टक्कल पडलेल्या मॉडेलचे फोटोशूट..."
Rozlyn Khan : अभिनेत्री रोजलिन खानने तिला कॅन्सर झाल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.
Rozlyn Khan Cancer : पेटासाठी फोटोशूट केल्याने मॉडेल आणि अभिनेत्री रोजलिन खान (Rozlyn Khan) चर्चेचा केद्रंबिंदू बनली. आता पुन्हा एकदा रोजलिन चर्चेत आली आहे. रोजलिन खान सध्या रुग्णालयात असून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहे.
कॅन्सर झाल्याची माहिती रोजलिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. रोजलिनने रुग्णालयातील एक फोटो शेअर करत लिहिलं आहे,"माझ्या आयुष्यातील हा एक अध्याय असेल, विश्वास आणि आशेने प्रत्येक अडथळ्याचा सामना करण्यास मी सज्ज आहे. माझी माणसं माझ्यासाठी प्रार्थना करत आहेत. जे घडते ते चांगल्यासाठीच होते".
रोजलिनने पुढे लिहिलं आहे,"मला मान आणि पाठदुखीशिवाय दुसरी कोणतीही लक्षणं नव्हती". रोजलिनच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिला काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला देत आहेत. तसेच ती लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
View this post on Instagram
रोजलिन ब्रँड्सना म्हणते,"आजारपणातही ती कामासाठी तयार आहे. जर कोणाला टक्कल पडलेल्या मॉडेलचे फोटोशूट करायचे असेल तर तो प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करू शकतो. रोजलिन कॅन्सरच्या उपचारासाठी केमोथेरपी घेणार आहे. त्यामुळेच तिने खास पोस्ट शेअर करत आजारपणातही कामासाठी तयार असल्याची माहिती ब्रँड्सना दिली आहे.
रोजलिन खान कोण आहे?
रोजलिन खान न्यूड फोटोशूट करत असल्याने नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह असते. बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते. रोजलीनने यापूर्वीही सविता भाभीच्या अवतारात फोटोशूट केले आहे. तसेच तिने अनेक मालिका, गाणी आणि सिनेमांत काम केलं आहे. तिने अनेक आयटम नंबरही केले आहेत.
संबंधित बातम्या