Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary: देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा झाले आई-बाबा; पोस्ट शेअर करत म्हणाले...
देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. गुरमीत आणि देबीना यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
![Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary: देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा झाले आई-बाबा; पोस्ट शेअर करत म्हणाले... debina bonnerjee birth baby girl gurmeet choudhary share post on social media Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary: देबिना आणि गुरमीत दुसऱ्यांदा झाले आई-बाबा; पोस्ट शेअर करत म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/11/55034f87dd23a0940e1fd7e5fefa972f1668164800565259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary: अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Chaudhary) आणि अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) दुसऱ्यांदा पालक झाले आहेत. गुरमीत आणि देबीना यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. देबिनाने यावर्षी 3 एप्रिल रोजी पहिल्या मुलीला जन्म दिला. या मुलीचं नाव त्यांनी लियाना ठेवलं. आता देबिना दुसऱ्यांदा आई झाली आहे. देबिना आणि गुरमीत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या घरी आलेल्या चिमुकलीचं स्वागत केलं आहे.
देबीना आणि गुरमीत यांची पोस्ट
देबीना आणि गुरमीत यांनी सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर केला. या फोटोवर 'इट्स अ गर्ल' असं लिहिलेलं दिसत आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिलं, 'आम्ही आमच्या मुलीचे या जगात स्वागत करत आहोत. आम्ही पुन्हा पालक झालो आहोत म्हणून आनंदी आहोत. आमचे बाळ वेळेपेक्षा लवकर जगात आले आहे. आशीर्वाद देत राहा आणि तुमच्या अखंड प्रेमाचा वर्षाव करत राहा.'
अनेक सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांनी देबीना आणि गुरमीत यांना शुभेच्छा दिल्या. कॉमेडियन भारती सिंह, सोनू सूद, स्मिता गोंदकर, माही वीज या सेलिब्रिटींनी देबीना आणि गुरमीतच्या पोस्टला कमेंट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांनी 2011मध्ये लग्नगाठ बांधली होती. मायावी, रामायण, पति पत्नी और वो, आहट, चिडिया घर या मालिकांमध्ये देबीनानं काम केलं आहे तर गुरमीतनं कुमकुम, पुनर विवाह - जिंदगी मिलेगी दोबारा या मालिकांमध्ये काम केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)