Riteish Deshmukh | रितेशलाही भुरळ आगरी-कोळीगीताची; Dance Video व्हायरल
मागील बऱ्याच दिवसांपासून एका आगरी- कोळी गीताचीच चर्चा सर्वत्र होत आहे. सहसा आगरी आणि कोळी गीतांची भाषा, त्यांचा ताल हे सारंकाही अनेकांच्याच पसंतीस उतरतं.

मुंबई : मागील बऱ्याच दिवसांपासून एका आगरी- कोळी गीताचीच चर्चा सर्वत्र होत आहे. सहसा आगरी आणि कोळी गीतांची भाषा, त्यांचा ताल हे सारंकाही अनेकांच्याच पसंतीस उतरतं. पण, सध्या चर्चेत असणारं हे गाणं काही भलतंच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं आहे. आयपीएल 2021 साठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघातील खेळाडूंनाही या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरता आलेला नाही. आता यातच भर पडली आहे, ती म्हणजे अभिनेता रितेश देशमुख याची.
रितेशचं सोशल मीडिया अकाऊंट कायमच चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरतं. पत्नी जेनेलिया आणि मुलांसोबत तो कायमच काही अफलातून पोस्ट शेअर करत असतो. यावेळी मात्र रितेशनं त्याचा एक दमदार सोलो परफॉर्मन्स सादर करत सर्वांची मनं जिंकली आहेत. त्याचा हा परफॉर्मन्स आहे, 'एक नारल दिलाय दर्या देवाला' या लोकप्रिय गाण्यावर.
In Pics | पृथ्वीवरील स्वर्गाला भेट देऊन परतली सारा अली खान
आगरी- कोळीगीत या प्रकारात मोडणाऱ्या या गाण्यावर रितेशनं सुरेख हावभाव करत नृत्य सादर केलं आहे. कठिण स्टेप्स नाहीत, किंवा भडक वेशभूषा नाही. अतिशय साध्यासोप्या अंदाजातच त्यानं बहुतांशी चेहऱ्याच्या हावभावांवरच गाण्यावर परफॉर्म केलं आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांनाही भावला आहे. आतापर्यंत रितेशच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये यावरील प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
View this post on Instagram
सोशल मीडियावर व्हायरल होणारे मीम्स म्हणू नका किंवा मग एखादा ट्रेंडिंग विषय. रितेश कायमच या अनोख्या विश्वात चर्चेत असणाऱ्या अनेक ट्रेंड्सना त्याच्याच पद्धतीनं हाताळत सर्वांची मनं जिंकतो. त्यामुळं फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर या वेगळ्याच दुनियेतही तो खऱ्या अर्थानं सुपरहिट आहे, असं म्हणायला हरकत नाही.


















