एक्स्प्लोर

बॉलिवूडमध्ये येतोय जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर! आलिया भट्टचा कधी न पाहिलेला अंदाज, कधी रिलीज होणार?

आतापर्यंत रोमँटिक आणि भावनिक भूमिका साकारलेल्या आलियाचा हा कधीही न पाहिलेला अ‍ॅक्शन अवतार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Alpha Poster Out: बॉलिवूडमध्ये लवकरच एक दमदार अ‍ॅक्शन थ्रिलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यश राज फिल्म्सच्या बहुप्रतिक्षित ‘अल्फा’ या चित्रपटाची थिएटर रिलीजची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट 10 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या घोषणेसोबतच चित्रपटाचा नवीन टीझर पोस्टरही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यामधील आलिया भट्टचा लूक सध्या जोरदार चर्चेत आहे. ( Bollywood Action Thriller)

आलिया भट्टचा ‘अल्फा’ अवतार 

या पोस्टरमध्ये आलिया भट्टचा एक वेगळाच आणि आक्रमक अवतार पाहायला मिळतो. तिच्या चेहऱ्यावर जखमा आणि कट्सच्या खुणा दिसत असून ती एखाद्या तीव्र संघर्षातून बाहेर पडल्यासारखी दिसते. या लूकमुळे चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर अ‍ॅक्शन आणि थरार पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. आतापर्यंत रोमँटिक आणि भावनिक भूमिका साकारलेल्या आलियाचा हा कधीही न पाहिलेला अ‍ॅक्शन अवतार असल्याने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

‘अल्फा’ या चित्रपटात आलिया भट्टसोबत अभिनेत्री शर्वरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या दोघींचा सामना अभिनेता बॉबी देओलसोबत होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चित्रपटात दमदार अ‍ॅक्शन सीन्स आणि तुफान संघर्ष पाहायला मिळणार आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रवैल यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी लोकप्रिय ठरलेली ‘द रेलवे मेन’ ही वेब सिरीज दिग्दर्शित केली होती. तर या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. विशेष म्हणजे ‘अल्फा’ हा आलिया भट्टचा यश राज फिल्म्ससोबतचा पहिलाच चित्रपट आहे. महिला-प्रधान अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून ओळखला जाणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मोठा अ‍ॅक्शन अनुभव ठरणार आहे. त्यामुळे आता 10 जुलै 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget