Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: पत्नीनं केलेल्या आरोपांवर उत्तरही दिलं आहे. अलिकडेच गोविंदानं एका मुलाखतील बोलताना पत्नी सुनीता आहुजा यांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलंय आणि विवाहबाह्य संबंध असल्याचं नाकारलं आहे.

Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: नव्वदच्या दशकातला सुपरस्टार अभिनेता गोविंदा (Govinda) सध्या त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा (Sunita Ahuja) घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आलेलं. यासाठी एक मराठी अभिनेत्री कारणीभूत असून तिच्यासोबत गोविंदाचे विवाहबाह्य असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच गोविंदानं आता सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. सर्वात आधी गोविंदानं विवाहबाह्य संबंधांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, पत्नीनं केलेल्या आरोपांवर उत्तरही दिलं आहे. अलिकडेच गोविंदानं एका मुलाखतील बोलताना पत्नी सुनीता आहुजा यांच्या दाव्यावर स्पष्टीकरण दिलंय आणि विवाहबाह्य संबंध असल्याचं नाकारलं आहे.
अलिकडेच, पत्नी सुनीता यांच्या अलीकडील सार्वजनिक वक्तव्यांबाबत पुन्हा विचारल्यावर गोविंदा म्हणाला की, मला कोणालाही कमीपणा वाटू द्यायचा नाही. मला वाटतंय की, जेव्हा कोणी स्वतःचं दुःख सार्वजनिकरित्या व्यक्त करू लागतं आणि तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट तेज असतं, तेव्हा तु्म्हाला वाटतं की, त्यांच्या नजरा काहीतरी सत्य लपवत तर नाही ना? कधीकधी लोक खूपच प्रामाणित दिसू शकतात, पण त्यांची लॉयल्टी भलतीकडेच असते. असं बोलून मी कुणालातरी मान खाली घालायला लावू शकतो, पण मी असं करणारा व्यक्ती नाही..."
पुढे बोलताना गोविंदा म्हणाला की, "माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की, एखाद्यानं आयुष्यात पुढे जावं आणि वर पोहोचावं. चांगलं काम करावं आणि पुढे जात राहावं. असं कधीही होत नाही की, एखाद्याचा अपमान केल्यानं त्यांचा आदर वाढेल. सर्वांशी चांगलं वागा, प्रेमानं वागा, विशेषतः तुमच्या घरी येणाऱ्या नव्या लोकांशी... जर लोक तुमच्या घरी आले तर, त्यांना चांगलं खायला द्या, जेणेकरून ते जेव्हा परत जातील, त्यावेळी तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील..."
सुनीता अहुजा नेमकं काय म्हणालेली?
मिस मालिनीशी बोलताना सुनीता अहुजानं 2025 हे वर्ष तिच्यासाठी खूप वाईट वर्ष असल्याचं म्हटलेलं. बोलताना तिनं सांगितलेलं की, "2025 हे वर्ष माझ्यासाठी खूप वाईट होतं. माझं कौटुंबिक जीवन विस्कळीत झालं होतं. मी गोविंदाबद्दल गोष्टी ऐकत होते, जे ऐकू येत होतं, त्यावर मी खूश नव्हते. काही गोष्टींसाठी एक विशिष्ट वय असतं आणि 63 व्या वर्षी, एखाद्याबाबत या गोष्टी ऐकणं चांगलं नसतं, विशेषतः जेव्हा तुमची मुलं मोठी होतात तेव्हा... 2026 मध्ये, मला आशा आहे की, देव गोविंदाला थोडी बुद्धी देईल. त्याला हे समजलं पाहिजे की, कुटुंब हे कुटुंब असतं आणि जेव्हा तुम्ही संकटात असता, तेव्हा कोणीही तुमच्या पाठीशी उभं राहत नाही. ते फक्त पैशासाठी असतात... एकदा तुम्ही त्यांना पैसे देणं बंद केलं की, ते निघून जातील..."
मुंबईत अभिनेत्री बनण्याच्या आशेनं येणाऱ्या तरुणी कशा प्रसिद्ध स्टार्सना फसवतात आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करतात, यावरही सुनीतानं भाष्य केलेलं. सुनीता म्हणालेली की, "आजकाल सिनेविश्वात मुलींना संघर्ष करावा लागतोय. त्यांना स्वतःचं पालनपोषण करण्यासाठी शुगर डॅडीजची आवश्यकता असते. नंतर त्या सुपरस्टार्सना ब्लॅकमेल करतात, पण तुम्ही भोळे नाही आहात. तुम्ही 63 वर्षांचे आहात. तुमचं कुटुंब चांगलं आहे, एक सुंदर पत्नी आहे आणि दोन मोठी मुलं आहेत. तुम्ही 63 वर्षांच्या वयात हे करू शकत नाही. जर तुम्ही लहान असताना हे केलं असतं तर, ते वेगळं असतं. आम्ही लहान असताना चुका केल्या, पण या वयात नाही. तुम्हाला टीना (गोविंदा आणि सुनीता यांची मुलगी) चं लग्न करावं लागेल आणि यशचं संपूर्ण करिअर त्याच्यासमोर आहे. त्यानं त्यावर लक्ष केंद्रीत करावं..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















