बिग बॉस मराठीच्या घरात घन:श्याम दरवडेला नारळ, छोटा पुढारी झाला एलिमिनेट!
आजच्या भाऊच्या धक्क्यावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. या आठवड्यात घन:श्याम दरवडे हा एलिमिनेट झाला आहे. म्हणजेच आज घन:श्याम दरवडेचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला आहे.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात चांगलाच कल्ला झाला. दरम्यान आज रविवारी (8 सप्टेंबर) बिग बॉसच्या घरातून एक सदस्य बाहेर जाणार आहे. सर्वांचा लाडका घन:श्याम दरवडे हा यावेळी बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. आजच्या भाऊच्या धक्क्यावर छोट्या पुढारीचा बिग बॉसचा प्रवास संपला आहे.
घन:श्याम दरवडेचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला
या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले होते. घन:श्याम दरवडे, निक्की तांबोळी, आर्या जाधव, अभिजित सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अरबाज पटेल यांचा समावेश होता. यापैकी धनंजय पोवार, अभिजित सावंत यासारखे स्पर्धक अनेकवेळा नॉमिनेट झाले आहेत. पण प्रेक्षकांनी भरभरून वोट दिल्यामुळे ते स्पर्धेत अद्याप कायम टिकून आहेत. यावेळीच्या एलिमिनेशनमध्ये कोणाचा नंबर येणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र यावेळीदेखील आर्या, धनंजय, अभिजित आणि सुरज चव्हाण पुन्हा एकदा वाचले आहेत. या आठवड्यात घन:श्याम दरवडे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.
View this post on Instagram
सुरज चव्हाणचं तोंडभरून कौतुक
रविवारच्या भाऊच्या धक्क्यावर आज अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या आठवड्यात सुरज चव्हाण बिग बॉसच्या घराचा कॅप्टन आहे. त्यामुळे सुरजला आठवड्यासाठी इम्यूनिटी मिळाली आहे. सुरज चव्हाणला कॅप्टन्सी मिळाल्यानंतर रितेश देशमुखने सुरजचे कौतुक केले आहे. कॅप्टन म्हणजे जबाबदारी आहे, योग्य भूमिका घ्या असा सल्लाही रितेश देशमुखने सुरज चव्हाणला दिला आहे.
हेही वाचा :
Jahnavi Killekar : 'सूरज का कॅपेबल ते सांगा आधी', जान्हवीच्या हातातोंडाशी आलेली कॅप्टन्सी गेली