Jahnavi Killekar : 'सूरज का कॅपेबल ते सांगा आधी', जान्हवीच्या हातातोंडाशी आलेली कॅप्टन्सी गेली
Jahnavi Killekar : बिग बॉसच्या घरात जान्हवीच्या हातातोंडाशी आलेली कॅप्टन्सी गेल्याचं पाहायला मिळालं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi New Season) कॅप्टन्सीचं तिकीट कन्फर्म करुन जान्हवी, सूरज, वर्षाताई आणि अंकिता हे स्पर्धक कॅप्टन्सीच्या टास्कसाठी पुढे गेले. त्यामुळे या चौघांमध्ये कॅप्टन्सीचा टास्क रंगल्याचं दिसलं. पण यावेळी घरातल्यांनी सूरजला पाठिंबा देत कॅप्टनपदी त्याची निवड केली. यामध्ये जान्हवीच्या हातातोंडाशी आलेली कॅप्टन्सी मात्र निघून गेली.
'बिग बॉस मराठी'च्या घरात सध्या कॅप्टनसीचा टास्क सुरू आहे. गेले 40 दिवस सर्वच सदस्य प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. आता या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. वर्षा ताई, जान्हवी, सूरज, अंकिता हे चार जणं कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून पात्र ठरले. यात सूरज कॅप्टन व्हावा, अशी इच्छा घरातील सदस्यांनी व्यक्त केली.
'तुम्हाला मनापासून वाटतं मी कॅप्टन होण्याच्या लायकीची...'
सूरजच्या कॅप्टनसीचा निर्णय जान्हवीला मात्र पटला नाही. बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये हे चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रोमोमध्ये जान्हवी घरातील सदस्यांना विचारताना दिसतेय,"कॅप्टनसीसाठी सूरज का कॅपेबल आहे मला आता सांगा. तुम्हाला मनापासून वाटतं मी कॅप्टन होण्याच्या लायकीची नाही. जे सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही म्हणत आहात तुम्ही सुधारलात तरी काय फरक पडत नाही. आम्ही तुमच्यासोबत तसचं वागणार".
कॅप्टन सूरज घरातील सर्व कामं कशी करणार? घरातील भांडणांचं प्रमाण कमी करणार का? याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे. बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूपच रंगतदार असणार आहे. सध्या नेटकऱ्यांकडून मात्र सूरजच्या कॅप्टनसीचं कौतुक होताना दिसत आहे.
गुलिगत किंग सूरज चव्हाण बिग बॉसचा नवा कॅप्टन
बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमो आऊट झाला असून यामध्ये कॅप्टन्सी कार्याची झलक पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने झापुक झुपूक गेम करत बाजी मारली आणि तो आता बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे.