(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bageshwar Dham : बागेश्वर बाबा यांच्याशिवाय नसतं झालं अनंत अंबानीचं लग्न? अंबानींच्या स्पेशल विमानातून धीरेन शास्त्रींचा ऑस्ट्रेलिया टू मुंबई प्रवास
Bageshwar Dham Sarkar On Anant Ambani Wedding: अनंत अंबानींच्या लग्नाला बागेश्वर बाबा यांनी देखील हजेरी लावली होती.
Bageshwar Dham Sarkar On Anant Ambani Wedding: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची जगभरात चर्चा झाली. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला देश-विदेशातील सर्व क्षेत्रातील दिग्गज आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांनी यावर्षी 12 जुलै रोजी मुंबईतील वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी यावर्षी 12 जुलै रोजी मुंबईतील वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले.
अंबानी कुटुंबाच्या या लग्नसोहळ्यात देशातील आणि जगातील दिग्गजांनी सहभाग घेतला होता. बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे देखील अनंत आणि राधिका यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. नुकतच बागेश्वर बाबांनी एका पॉडकास्टमध्ये अनंत अंबानींच्या लग्नाविषयी भाष्य केलं हे.
अनंत अंबानीच्या लग्नात हजेरी
बागेश्वर धाम सरकार यांनी नुकतत सुशांत सिन्हाच्या पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली.यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने भाष्य केले. त्यांना अनंत अंबानी यांच्या लग्नाबद्दलही विचारण्यात आले. सुशांतने धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना विचारलं की, तुमच्या एका प्रवासाची खूप चर्चा आहे. तुमच्यासाठी प्रायव्हेट जेट आले आणि तुम्ही अंबानीजींच्या मुलाच्या लग्नाला गेलात. ते लग्न कसं होतं?
यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, 'खूप छान. सनातनसाठी खूप चांगले. आजपर्यंत आम्ही यावर कुठेही बोललो नव्हतो. पण अनंत आमचा खूप चांगला मित्र आहे. त्याचं जे आमच्यासाठी प्रेम आहे ते आम्ही नाही विसरु शकत. त्याचे सनातन आणि संतांची काळजी घेणे आम्हाला आवडले.
अन् बागेश्वर बाबा अनंत अंबानीच्या लग्नाल पोहचले
बागेश्वर बाबा पुढे म्हणाले की, त्यांनी अनंतची जामनगरमध्ये भेट घेतली होती. नंतर त्याने तिला आपल्या लग्नाचे आमंत्रण दिले. धीरेंद्र शास्त्री म्हणाले, 'त्यांनी (अनंत अंबानी) लग्नाला यायला सांगितले होते. त्यावेळी आम्ही ऑस्ट्रेलियात होतो. तेव्हा त्याच्यासोबत असलेल्यांनी मला सांगितलं की, तुम्हाला जे विमान घेऊन येईल तेच विमान तुम्हाला पुन्हा सोडेल. अनंत अंबानी मला दादा म्हणतात. तो म्हणाला, दादा तुला यावं लागेल, तू नाही आलास तर मी लग्न करणार नाही.
ही बातमी वाचा :
Bhaucha Dhakka : 'असा माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही', भाऊच्या धक्क्यावर अभिजीतने मांडलं रोखठोक मत