एक्स्प्लोर

अनुराग कश्यप पोलीस चौकशीला हजर, पायल घोषच्या आरोपांचं खंडन करत सादर केले पुरावे

ऑगस्ट आणि सप्टेंबर 2013 मध्ये कामाच्या संदर्भात श्रीलंका, म्यानमारमध्ये होतो. अनुरागने यासंबंधी पोलिसांना सर्व पुरावे सादर केले. यामध्ये विमानाचं तिकीट आणि इमिग्रेशनचे कागदपत्र आहेत.

मुंबई : अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक, निर्माता अनुराग कश्यववर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. याबाबत मुंबईतील वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये अनुराग कश्यपने आपला जबाब नोंदवला. सुमारे 8 तासांच्या दिर्घ चौकशीनंतर अनुराग पोलिस स्टेशनमधून बाहेर पडला.

आपल्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांवर अनुराग कश्यपने वर्सोवा पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, एका चित्रपटाच्या संदर्भात तो ऑगस्ट 2013 मध्ये श्रीलंका येथे गेला होता. याबाबतचे कागदपत्र त्याने पोलिसांना दिले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2013 मध्ये कामाच्या संदर्भात श्रीलंका, म्यानमारमध्ये होतो. अनुरागने यासंबंधी पोलिसांना सर्व पुरावे सादर केले. यामध्ये विमानाचं तिकीट आणि इमिग्रेशनचे कागदपत्र आहेत.

अनुराग कश्यपने ज्या ठिकाणी घटना घडल्याचा दावा केला आहे, यास पूर्णपणे नकार दिला आहे. अनुराग कश्यपने आपला जबाब नोंदवताना पुरावेही सादर केले आहेत, जे तक्रारदाराच्या आरोपाचे खंडन करतात.

बॉलिवूड अभिनेत्रीकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

वर्सोवा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यपने पोलिसांच्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. अनुरागने पोलिसांना सांगितले की, मला फक्त कामानिमित्त पायल घोषला ओळखतो. मी मागील अनेक महिन्यांपासून पायलशी संवाद साधलेला नाही किंवा भेटलो देखील नाही. मी पायलला वर्सोवा येथील त्यांच्या घरी भेटलो नाही किंवा कधी लैंगिक अत्याचारही केला नाही.

अनुराग कश्यप पुढे म्हणाला की, पायलने माझ्यावर असे आरोप केले आहेत हे जेव्हा मला कळले तेव्हा मला धक्का बसला. हे सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. कदाचित कट रचून माझ्याविरूद्ध तक्रार केलेली आहे. मी या प्रकरणात पूर्णपणे निर्दोष आहे.

वर्सोवा पोलिसांना दिलेल्या जबाबात, अनुरागने ड्रग्ज घेण्याबाबतही नकार दिला आहे. अनुराग म्हणाला की, मी फक्त सिगारेट ओढतो. पोलीस अनुरागला पुन्हा चौकशीसाठी बोलावणार आहेत. याव्यतिरिक्त ऑगस्ट आणि सप्टेंबर 2013 मध्ये पोलिसांनी परदेशात असल्याचा अतिरिक्त पुरावा सादर करण्यासही सांगितले आहे.

संबंधित बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
बिग बॉस फेम युट्युबरनं पत्नीवर उगारला हात; घर सोडून गेली बायको, भावाकडून पोलखोल, स्क्रिनशॉट शेअर
Bigg Boss Marathi 6: शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
शॉकिंग! रुचिता जामदारला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता? धाय मोकलून रडली.. प्रोमो व्हायरल
Dhurandhar 2: धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार
धुरंधर 2’मध्ये पुन्हा दिसणार का ‘रहमान डकैत’? अक्षय खन्नाच्या एंट्रीबद्दल मोठा सस्पेन्स, चाहत्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
शेतमजुराचा लेक UPSC उत्तीर्ण, आई-वडिलांच्या चेहऱ्यावर अत्यानंद; अभिनंदनासाठी पत्र्याच्या शेडमध्ये माणसांचा राबता
Embed widget