ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठं नाव समोर! NCB च्या सूत्रांकडून दीपिका पादुकोण हिच्या नावाला दुजोरा
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत आहे. आता दीपिका पदुकोण हिचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दीपिकाचा उल्लेख केला आहे.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्स केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. सुशांत सिंग राजपूतची टॅलेंट मॅनेजर जया शाहच्या एका कथित चॅट मध्ये D आणि K नावाचा उल्लेख आहे. NCB च्या सुत्रांच्या माहितीनुसार D चा अर्थ दीपिका पादुकोण आणि K चा अर्थ करिश्मा (जयाची सहकारी).
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने सुशांत सिंग की माजी व्यवस्थापक श्रुति मोदी आणि उनकी ‘टॅलेंट मॅनेजर’ जया शाहला सोमवारी एजन्सीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. जया शाह दुपारी अडीचच्या सुमारास दक्षिण मुंबईतील एनसीबीच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयात पोहोचली. जया शाह हिला एनसीबीने मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे होऊ शकतात.
काय आहे चॅट?
D' to K: तुमच्याकडे माल आहे का?
K' reply: हो, पण घरी आहे, मी बांद्रामध्ये आहे.
K writes: जर तुम्हाला हवा असेल तर अमितला सांगते.
D writes: हो. प्लीज
K writes: अमित जवळ आहे, तो ठेवतो.
D writes: Hash ना?
D writes: गांजा नाही
K writes: कोको जवळ तू कधी येणार आहेस?
D writes: साडेअकरा ते 12 दरम्यान.
सारासह या अभिनेत्रींना समन्स पाठवले जाईल अन्वेषण यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एनसीबी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सायमन खंबाटा यांना ड्रग्ज संबंधित प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात चौकशीसाठी बोलावणार आहे.
Exclusive | सुशांत सिंह राजपूतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये केमिकल अंश; प्रकरणाला नवीन वळण लागणार?
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह यांनी गेल्या आठवड्यात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. रिया चक्रवर्ती अंमली पदार्श प्रकरणात तिचे नाव जोडणाऱ्या माध्यमांवर बंधने घालण्याची मागणी केली होती. माध्यमांना बातमी लिक कशा होतात याची चौकशी होणे आवश्यक आहे. कारण अशा बातम्यांमुळे एखाद्याची प्रतिमा पूर्णपणे मलीन होते.
आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह डझनहून अधिक लोकांना अटक केली आहे.
Payal Ghosh Interview | अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आरोप, अभिनेत्री पायल घोषसोबत बातचीत























