बॉलिवूड अभिनेत्रीकडून दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचे आरोप केले होते. एवढंच नाहीतर तिने एक पोस्ट करत या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदतही मागितली होती.
मुंबई : एका बॉलिवूड अभिनेत्रीने काल (मंगळवार) वर्सोवा पोलीस ठाण्यात चित्रपट दिगदर्शक अनुराग कश्यपच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गेले तीन ते चार दिवस ही अभिनेत्री आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर युद्ध सुरू होते. मात्र 2015 साली अनुरागने आपल्यावर त्याच्या घरी अतिप्रसंग करून, डांबून ठेवल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. या अनुषंगाने अभिनेत्रीने तिच्या वकीलांसह गुन्हा नोंदवण्यासाठी प्रथम ओशिवरा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र अनुराग कश्यप हा वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहात असल्याने अखेर हा गुन्हा वर्सोवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. काल संध्याकाळी साडे सात वाजतच्या दरम्यान अभिनेत्री वर्सोवा पोलीस ठाण्यात पोहचली होती. त्यानंतर तब्बल चार तास तिने तिथे थांबून आपली तक्रार नोंदवली.
शनिवारी बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत दिग्दर्शक अनुराग कश्यपने तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचे आरोप केले होते. एवढंच नाहीतर तिने एक पोस्ट करत या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मदतही मागितली होती. अभिनेत्रीने दावा केला आहे की, ही घटना 2014-2015मधील आहे.
अनुराग कश्यपने या बॉलिवूड अभिनेत्रीद्वारे करण्यात आलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. त्याने रविवारी ट्विटरवर प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की, 'काय प्रकरण आहे, मला शांत करण्याचा प्रयत्न करण्यासाठी खूप वेळ लागला. चला ठिक आहे. मला शांत करता, करता एवढं खोटं बोललं गेलं की, एक महिला असूनही दुसऱ्या एका महिलेलाही आपल्यासोबत खेचून आणलं. थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम. मी फक्त एवढंच सांगेल की, जे काही आरोप आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही.' अनुराग कश्यपने अभिनेत्रीने केलेल्या आरोपांसंदर्भात इतरही अनेक ट्वीट केले आहेत.
अनुराग कश्यपचं ट्वीट :
क्या बात है , इतना समय ले लिया मुझे चुप करवाने की कोशिश में । चलो कोई नहीं ।मुझे चुप कराते कराते इतना झूठ बोल गए की औरत होते हुए दूसरी औरतों को भी संग घसीट लिया। थोड़ी तो मर्यादा रखिए मैडम। बस यही कहूँगा की जो भी आरोप हैं आपके सब बेबुनियाद हैं ।१/४
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) September 19, 2020
काय आहे प्रकरण?
दिग्दर्शक अनुराग कश्यपसाठी रविवारचा दिवस फार बरा नव्हता. कारण, कशात काही नसताना अचानक एका बॉलिवूड अभिनेत्रीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले. अनेकांसाठी हा मोठा धक्का होता. आपल्याशी बोलताना त्याने विशिष्ट मागणी केली. त्यानंतर बोलताना तो म्हणाला, तू इतकी शाय का आहेस, मी जवळपास 200 मुलींसोबत 'वेळ' घालवला आहे. आणि त्या सर्वांसाठीच तो चांगला वेळ होता. बॉलिवूड अभिनेत्रीने हे स्टेटमेंट दिल्यावर इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली.
महत्त्वाच्या बातम्या :
- पायल घोषचे अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप; राधिका आपटे, रिचा चढ्ढासह पहिल्या पत्नीनेही केलं अनुरागचं समर्थन
- जया सहाची एनसीबीकडून चौकशी; अभिनेत्री श्रद्धा कपूरला सीबीडी ऑइल दिल्याची कबुली
- ड्रग्ज प्रकरणात दिया मिर्झाचं नाव समोर, "कधीचं ड्रग्ज न घेतल्याचं" दियाचं स्पष्टीकरण
- ड्रग्स प्रकरणात सर्वात मोठं नाव समोर! NCB च्या सूत्रांकडून दीपिका पादुकोण हिच्या नावाला दुजोरा