(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ड्रग्ज प्रकरणात दिया मिर्झाचं नाव समोर, "कधीचं ड्रग्ज न घेतल्याचं" दियाचं स्पष्टीकरण
सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींची नावे समोर येत आहे. आता दीपिका पदुकोण पाठोपाठ दिया मिर्झाचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दियाच्या नावाचा उल्लेख केला आहे.
मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री दिया मिर्जाचंही नाव समोर आल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळाली आहे. ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी आणि अंकुश यांच्या चौकशीदरम्यान दिया मिर्जाचं नाव समोर आले आहे. एनसीबीजवळ दिया मिर्जाच्या ड्रग्ज खरेदीचे पुरावेही असल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळत आहे. मात्र दिया मिर्जानं ट्विटरवरुन सर्व आरोप फेटाळलेत.
आपल्या ट्वीटमध्ये दिया म्हणाली, "माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. सर्व आरोपांचं मी खंडन करते.अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे. शिवाय इतक्या वर्षांपासूनमेहनतीनं उभं केलेल्या माझ्या करिअरवर याचा परिणाम होतोय.मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही किंवा खरेदी देखील केले नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपांचं खंडन करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार."
3) I have never procured or consumed any narcotic or contraband substances of any form in my life. I intend to pursue the full extent of legal remedies available to me as a law abiding citizen of India. Thanks to my supporters for standing by me.
Dia Mirza — Dia Mirza (@deespeak) September 22, 2020
दियाने कुठलीही कारवाई होण्यापुर्वीच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अन्वेषण यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एनसीबी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सायमन खंबाटा यांना ड्रग्ज संबंधित प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात चौकशीसाठी बोलावणार आहे. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्यासह डझनहून अधिक लोकांना अटक केली आहे.
संबंधित बातम्या :
Deepika drugs controversy | ड्रग्ज चॅटमध्ये आता दीपिका पदुकोनचंही नाव,"माल है क्या?", दीपिकाचा मेसेज