Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनचं तुरूंगातील कैद्यांसोबत स्नेहभोजन; सांगितला शूटिंगचा अनुभव
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) दसवी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं.
Abhishek Bachchan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. त्याच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली तर काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. सध्या अभिषेक ओटीटी प्लॅटफोर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याचा लूडो हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. आता त्याचा दसवी (Dasvi) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दसवी चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिषेकनं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं.
अभिषेकनं मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'दसवी या चित्रपटाचं शूटिंग हे सेंट्रल जेलमध्ये करण्यात आलं. डायरेक्टर तुषार यांनी खऱ्या जेलमध्ये शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी आम्ही सहा आठवडे शूटिंग केलं. त्या तुरूंगामधील कैदी हे सपोर्टिव होते.अनेकांना तुरूंगाची वाईट बाजू माहित असती पण तुरूंगाची चांगली बाजू मला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कळाली. तिथे सर्व कैदी नियमांचे पालन करत होते. मी त्यांच्यासोबत वेळ घालवत होतो. तसेच त्यांच्यासोबत मी जेवण देखील केले तसेच सेंट्रल जेलधील 2000 कैद्यांसाठी आम्ही या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे देखील आयोजन केले होते.'
View this post on Instagram
7 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले आहेत. अभिषेक बच्चनसोबतच यामी गौतम आणि निम्रत कौर या अभिनेत्रींनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या
- Sher Shivraj : अंगावर शहारे आणणाऱ्या 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित
- Shehnaaz Gill : शहनाज गिलच्या आठवणीत अजूनही सिद्धार्थ, वॉलपेपरवरही तोच...
- Tejasswi Prakash : तेजस्वीनं घेतली आलिशान गाडी; शोरूममध्ये केली पूजा, किंमत माहितीये?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha