Sher Shivraj : अंगावर शहारे आणणाऱ्या 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित
Sher Shivraj : 'शेर शिवराज' हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Sher Shivraj : अंगावर शहारे आणणारे 'शेर शिवराज'चे (Sher Shivraj) नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरमध्ये चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसत आहे. 'शेर शिवराज' हा सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्पाल लांजेकरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
'शेर शिवराज' सिनेमाचे पोस्टर शेअर करत चिन्मय मांडलेकरने लिहिले आहे,"अहोरात्र अन्याय, अत्याचार सहन करत उभा असलेला सह्याद्रीचा स्तंभ कडकडला, दाही दिशा थरथरल्या, काळ पुरुषाच्याही कानठळ्या बसल्या आणि प्रचंड गर्जना करत प्रकटला सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह".
View this post on Instagram
'शेर शिवराज' सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये जिजाऊंची भूमिका साकारणाऱ्या मृणाल कुलकर्णी दिसत आहेत. तसेच या पोस्टरमध्ये अफजल खानची झळक पाहायला मिळत आहे. 'शेर शिवराज' सिनेमात अफजल खानची भूमिका बॉलिवूड अभिनेता मुकेश ऋषी साकारणार आहे. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला ते पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Rashmika Mandanna : विजय थलापतीच्या आगामी सिनेमात झळकणार नॅशनल क्रश रश्मिका मंदाना, वाढदिवशी निर्मात्यांनी केली घोषणा
Mere Desh Ki Dharti : देश बदल रहा है! 'मेरे देश की धरती' सिनेमाचे पोस्टर आऊट
Samrenu : भाजप नेत्या पंकजा मुंडेच्या हस्ते 'समरेणू'चे पोस्टर लॉंच, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha