Tejasswi Prakash : तेजस्वीनं घेतली आलिशान गाडी; शोरूममध्ये केली पूजा, किंमत माहितीये?
तेजस्वीनं ऑडी क्यू 7 (Audi Q7) ही आलिशान गाडी घेतली आहे.
![Tejasswi Prakash : तेजस्वीनं घेतली आलिशान गाडी; शोरूममध्ये केली पूजा, किंमत माहितीये? tejasswi prakash buys new audi q7 car spotted at showroom with karan kundrra Tejasswi Prakash : तेजस्वीनं घेतली आलिशान गाडी; शोरूममध्ये केली पूजा, किंमत माहितीये?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/1f92ed24510bb402e370487ab71aaab0_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tejasswi Prakash : छोट्या पडद्यावरील बिग बॉस-15 (Bigg Boss 15) या शोमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला (Tejasswi Prakash) विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या 15 व्या सिझनची ती विजेती ठरली. सध्या नागिन (Naagin) या मालिकेतून तेजस्वी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ही मालिका हिट झाल्यानंतर तेजस्वीनं ऑडी क्यू 7 (Audi Q7) ही आलिशान गाडी घेतली आहे.
गुढीपाडव्याला तेजस्वीनं ऑडी क्यू 7 आलिशान गाडी घेतली आहे. पण शूटिंगमध्ये ती बिझी होती, त्यामुळे तीन दिवसानंतर ती ही कार घरी घेऊन जाण्यासाठी शोरूममध्ये गेली. कारची डिलेव्हरी घेण्यासाठी तेजस्वीसोबतच करण कुंद्रा देखील गेला होता. तिनं शोरूममध्ये पूजा केली, त्यानंतर गाडी समोर नारळ फोडून ती ही घरी घेऊन गेली.
View this post on Instagram
गाडीची किंमत
तेजस्वीनं खरेदी केलेल्या गाडीची किंमत जवळपास एक कोटी आहे. 'खतरों के खिलाडी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विथ कपिल' आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता.
संबंधित बातम्या
- Sher Shivraj : अंगावर शहारे आणणाऱ्या 'शेर शिवराज'चे नवे पोस्टर प्रदर्शित
- Shehnaaz Gill : शहनाज गिलच्या आठवणीत अजूनही सिद्धार्थ, वॉलपेपरवरही तोच...
- Mere Desh Ki Dharti : देश बदल रहा है! 'मेरे देश की धरती' सिनेमाचे पोस्टर आऊट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)