एक्स्प्लोर

Vasai Virar Election 2022 : वसई विरार महापालिका आरक्षण सोडत घोषित; कोणाचा प्रभाग सुरक्षित, कोणाची जागा धोक्यात?

Vasai Virar Municipal Corporation Election 2022 Reservation Lottery : वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. कोणाचा प्रभाग सुरक्षित, कोणाची जागा धोक्यात?

Vasai Virar Election : वसई विरार शहर महानगरापालिकेच्या 2022 साठी आरक्षणाची सोडत आज विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात पार पडली. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिला आणि पुरुषांसाठी आरक्षण काढण्यात आलं आहे. यंदा सध्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमुळे एका प्रभागात तीन सदस्य असल्याने विविध पक्षातील प्रस्थापितांना याचा म्हणावा तसा फटका बसला नाही. 

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल तब्बल अडीच वर्षानंतर वाजले आहे. महानगरपालिकेच्या एकूण 42 प्रभागात 126 सदस्य निवडून येणार आहेत. यंदा ओबीसी आरक्षणाशिवाय 42 प्रभागात त्रिसदस्यी प्रभाग रचना असल्याने प्रत्येक वॉर्डमध्ये एक किंवा दोन महिला आणि एक किंवा दोन पुरुष आहेत. यंदाची आरक्षण सोडत कुणालाही चिंतेत टाकणारी नसली तरी काहींना फटका बसला आहे. मागच्या निवडणुकीत 115 नगरसेवकांपैकी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे 107 सदस्य संख्या होती. तर बविआ पुरस्कृत 1 अपक्ष, शिवसेनेची 5, भाजपाला 1 तर अपक्ष म्हणून एक मनसेचा पदाधिकारी निवडून आलेला. यंदा बहुजन विकास आघाडीच लक्ष्य पैकीच्या पैकी जागा निवडून आणण्याचं असून याला महाविकास आघाडी छेद देणार असं वक्तव्य शिवसेनेने केलं आहे. 

यंदाच्या आरक्षण सोडतीचा फटका काहींना बसला असला तरी बहुजन विकास आघाडीच्या दिग्गजांना आरक्षण सोयीच झालं आहे. एकूण 42 प्रभागातील 126 सदस्य संख्येत पुरुषांना 63 जागा तर महिलांना 63 जागा होत्या. त्यात सर्वसाधारण पुरुष गटात 58, अनुसूचित जातीत पुरुष - 2, अनुसूचित जमाती पुरुष - 3 यावर आरक्षण पडलं आहे. तर सर्वसाधारण महिला गटात 57, अनुसूचित जातीत महिला गटात -3, अनुसूचित जमाती महिला - 3 असे आरक्षण पडलं आहे. त्रिसदस्यी पद्धतीमुळे आरक्षणाचा फटका जास्त कुणाला बसला नाही. मात्र काहींना बसला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे

कोणाकोणाचे प्रभाग सुरक्षित तर कोणाची जागा धोक्यात?

1. माजी महापौर प्रवीण शेट्टी यांचा पूर्वीचा प्रभाग 110, आताचा प्रभाग 39 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.

2. माजी महापौर रुपेश जाधव यांचा पूर्वीचा प्रभाग 80, आताचा प्रभाग 29 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.

3. शिवसेनच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांचा पूर्वीचा प्रभाग 97, आताचा प्रभाग 36 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.

4. शिवसेनचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांचा पूर्वीचा प्रभाग 62, आताचा प्रभाग 22 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.

5. बविआचे नगरसेवक माजी स्थायी सभापती प्रशांत राऊत यांचा पूर्वीचा प्रभाग 30, आताचा प्रभाग 11 आणि 12 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.

6. बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हितेंद्र ठाकूरांचे बंधू पंकज ठाकूर यांचा पूर्वीचा प्रभाग 31, आताचा प्रभाग 10 - त्यांच्यासाठी प्रभाग सेफ झाला आहे.

7. बविआचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर उमेश नाईक यांचा पूर्वीचा प्रभाग 48, आताचा प्रभाग 14 - त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.

8. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंह यांचा पूर्वीचा प्रभाग 77, आताचा प्रभाग 28 - त्यांच्या प्रभागात एक पुरुष सर्वसाधारण गटात तर दोन महिला एक अनुसूचित जाती आणि दुसरी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण पडल्याने त्यांची जागा धोक्यात आली आहे. सर्वसाधारण पुरुष गटातून त्यांना निवडणूक लढवावी लागेल. 

9. भाजपाचे एकमेव माजी नगरसेवक किरण भोईर यांचा पूर्वीचा प्रभाग 86, आताचा प्रभाग 29 - त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.

10. अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेले मनसेचे पदाधिकारी प्रफुल पाटील यांचा पूर्वीचा प्रभाग 73, आताचा प्रभाग 26 - त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Meet Mahadev Munde : सुप्रिया सुळेंची दिवंगत महादेव मुंडेच्या घरी सांत्वनपर भेटSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाने पासपोर्ट जमा करवा, सुप्रीम कोर्टचे निर्देशAnandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पाBharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanaji Sawant Security: बँकॉकचं विमान समुद्रातून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, फडणवीसांच्या आदेशामुळे 48 पैकी फक्त एक सुरक्षारक्षक उरला
बँकॉकचं विमान हवेतून माघारी फिरवणाऱ्या तानाजी सावंतांचा प्रभाव संपला, 48 पैकी फक्त 1 बॉडीगार्ड उरला
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात
कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयात "कायद्याचा दवाखाना"; अभिनव संकल्पना, कसे असणार कामकाज?
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
कुस्ती स्पर्धा म्हणजे बारामती ॲग्रोचा कार्यक्रम नाही; संग्राम जगतापांचा रोहित पवारांवर जोरदार पलटवार
SIP : शेअर बाजारात धक्के इकडे SIP खाती खटाखट बंद, जानेवारीत एसआयपी खात्यात विक्रमी घट, आकडेवारी समोर
शेअर बाजारातील घसरणीमुळं धक्के सुरुच, SIP खाती खटाखट बंद, जानेवारी महिन्यातील आकडे समोर
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील 6 मोठे निर्णय; ANTF मध्ये 346 पदासांठी भरती, 6 वा वित्त आयोगही स्थापन होणार
Bharat Gogawale : राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
राजन साळवींनंतर वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; ऑपरेशन टायगरच्या चर्चा
PM Kisan Scheme : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार, किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार?
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये जमा, 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये 'या' दिवशी येणार
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.