UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मानले जनतेचे आभार
UP Election Result 2022 Live Updates : सध्या भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत भाजप सत्ता राखणार का? की, सत्तापालट होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
LIVE
Background
UP Election Result 2022 Live Updates : सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ता कोण स्थापण करणार याचा फैसला काही तासात होणार आहे. योगी आदित्यनाथ, अखिलेश यादव, चंद्रशेखर आझाद रावण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सध्या भाजपची सत्ता असणाऱ्या उत्तर प्रदेश निवडणूकीत भाजप सत्ता राखणार का? की, सत्तापालट होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
मॅजिक फिगर 202
देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागा आहेत. या 403 जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये एकूण सात टप्प्यात मतदान झाले होते. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागा जिंकाव्या लागतील. जो पक्ष 202 जागा जिंकेल तो पक्ष उत्तर प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.
कुणाची प्रतिष्ठा पणाला?
- योगी आदित्यनाथ(भाजप) - गोरखपूर शहर
- चंद्रशेखर आझाद रावण (भीम आर्मी) - गोरखपूर शहर
- अखिलेश यादव (सपा)- करहल
- एस.पी. बघेल (भाजप)- करहल
- केशव प्रसाद मौर्य (भाजप- सिराथू
- डॉ. पल्लवी पटेल (सपा)-सिराथू
- शिवपाल यादव (सपा)- जसवंतनगर
- आझम खान (सपा)- रामपूर
- ओमप्रकाश राजभर (सपा+) - जहुराबाद
- कृष्णा पटेल (सपा+)- प्रतापगड
- स्वामी प्रसाद मौर्य (सपा)- फाझिलनगर
- दारा सिंह चौहान (सपा)- घोसी
- पंखुडी पाठक (काँग्रेस)- नोएडा
- राजेश्वर सिंह (भाजप)- सरोजिनीनगर
- आदिती सिंह (भाजप)- रायबरेली
उत्तर प्रदेशमध्ये गाजलेले मुद्दे
- राम मंदिर निर्माण
- शेतकरी आंदोलन
- हाथरस बलात्कार प्रकरण
- लखीमपूर हिंसाचार
- गंगा किनाऱ्यावरचे मृतदेह
एक्झिट पोल काय सांगतोय?
उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे. एक्झिट पोलनुसार भाजप 228 ते 244 तर समाजवादी पक्ष 132 ते 148 जागा जिंकण्याची शक्यता आहे.
2017 साली भाजपला बहुमत
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या
UP Election Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मानले जनतेचे आभार
संपूर्ण देशाचं उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडं लक्ष लागलं होतं. आम्हाला बहुमतानं विजयी केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जनतेचे आभार मानले आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही यूपी, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
UP Election Result 2022: लखनौ येथील भाजप कार्यलयात कार्यकर्त्यांचा जल्लोष
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे इतर नेते लखनौमधील पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.
[tw]https://twitter.com/ANINewsUP/status/1501896712922689538[/tw]
UP Election Result : अखिलेश यादव यांचा 61 हजार मतांनी विजय
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून, कऱ्हालमधून 61,000 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
Uttar Pradesh Election 2022: समाजवादी पक्षाच्या स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का
भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले नेते स्वामी प्रसाद मौर्य यांना फाजिलनगर मतदारसंघातून पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भाजपच्या सुरेंद्र कुमार कुशवाहा यांनी त्यांचा पराभव केला आहे.
BSP in Uttar Pradesh Election 2022: उत्तर प्रदेशात बसपाचा हत्ती 'बसला'; आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी
BSP Uttar Pradesh Election 2022 : उत्तर प्रदेशातील अनुसूचित जातींच्या समुदायाच्या आधारे बहुजनांचे राजकारण करणाऱ्या बहुजन समाज पक्षाची कामगिरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अतिशय वाईट राहिली. सध्याच्या कलानुसार बसपाला उत्तर प्रदेशात दोन अंकी जागादेखील गाठता आली नाही. बसपाची आतापर्यंतची ही वाईट कामगिरी आहे. उत्तर प्रदेशची सत्ता एकहाती खेचणाऱ्या बसपाच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मागील लोकसभा निवडणुकीत बसपाला मागील मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने बसपासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची होती. मात्र, बसपाची कामगिरी अतिशय सुमार राहिली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रिंगणातून बसपा मुख्य पटलावरून अदृष्य राहिले असल्याचे दिसून आले. बसपा प्रमुख मायावती यादेखील प्रचारात फारशा सक्रिय राहिल्या नाहीत. त्यामुळे बसपाने ही निवडणूक फारशी गांभीर्याने घेतली नसल्याची चर्चा होती.