Muktainagar Vidhan Sabha Constituency: मुक्ताई नगरमध्ये खडसे राखणार का गड? की चंद्रकांत पाटलांचा विजय होणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?
Muktainagar Vidhan Sabha Constituency: राज्यातील 288 जागांपैकी मुक्ताई नगर मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातो. ही जागा दीर्घकाळापासून भाजपच्या ताब्यात आहे.
Muktainagar Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) खऱ्या अर्थाने रंजक ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात रंगत दिसून येत असून, जनता कोणाच्या पारड्यात मत टाकणार याकडे आता जनतेचं लक्ष लागलंय. राज्यातील 288 जागांपैकी मुक्ताई नगर (Muktai Nagar Vidhan Sabha Constituency) मतदारसंघ हा राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. ही जागा दीर्घकाळापासून भाजपच्या ताब्यात आहे. मागील काही वर्ष भाजपच्या तिकिटावर एकनाथ खडसे येथून निवडून आले होते. या मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात थेट लढत होणार आहे. यंदा या निवडणूकीची रंजक झलक पाहायला मिळणार आहे.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला
जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा सर्वात चर्चेतला मतदारसंघ आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडी तर्फे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांच्यात लढत होणार आहे. महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा जागा ही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राज्यातील एक जागा मानली जाते. येथे भाजपचे सुप्रसिद्ध नेते एकनाथराव गणपतराव खडसे म्हणजेच एकनाथ खडसे यांनी सलग 6 वेळा निवडणूक जिंकली आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ खडसे यांचा हा विजय रथ थांबला. 2019 च्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
गेल्या निवडणुकीत काय झाले?
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ राज्यात नावाने कमी आणि एकनाथ खडसे यांच्या नावाने जास्त ओळखला जातो. 1990 पासून भाजपला या जागेवर कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. 1990 ते 2014 पर्यंत या जागेवर फक्त एकनाथ खडसे निवडणूक लढवत आहेत आणि जिंकत आहेत. पण, 2019 च्या निवडणुकीत असे काही घडले, ज्याची खडसेंनी कल्पनाही केली नसेल. या निवडणुकीत खडसे यांची कन्या रोहिणी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात चंद्रकांत निंबा पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. या निवडणुकीत चुरशीची लढत असतानाही चंद्रकांत निंबा पाटील यांनी रोहिणी यांचा 1,957 मतांनी पराभव केला.
महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा कोणाच्या हाती जाणार?
महाराष्ट्रात (Maharashtra District Vidhan Sabha Election 2024) यंदा एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला सर्व विधानसभांमध्ये मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एकूण 11 मतदार संघ असून ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे आणि चर्चेचे मतदारसंघ आहेत. मतमोजणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा महायुतीच्या हातात जाणार की महाविकास आघाडीच्या हातात जाणार हे निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागा जिंकण्यासाठी 145 जागांचे बहुमत आवश्यक आहे. मुक्ताई नगर (Muktai Nagar) विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 17 व्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा>>