एक्स्प्लोर

आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाणांसह लातूरचे देशमुख बंधू आघाडीवर, एक्झिट पोलचा अंदाज

महाराष्ट्रातील काही मुख्य लढतींचा देखील या सर्व्हेच्या माध्यमातून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये काही महत्वाच्या लढतीच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. यात प्रामुख्याने वरळीतून आदित्य ठाकरे हे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. राज्यात 60.46 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एबीपी माझा सी वोटरने निवडणुकीच्या निकालाचा सर्व्हे केला आहे. या एक्झिट पोलनुसार शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती 210 (198 ते 222) जागा जिंकण्याची शक्यता आहे. महाआघाडीला 63 (49 ते 75) जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर इतर पक्ष आणि अपक्षांना 15 (4 ते 21) मिळतील, असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही मुख्य लढतींचा देखील या सर्व्हेच्या माध्यमातून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये काही महत्वाच्या लढतीच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. यात प्रामुख्याने वरळीतून आदित्य ठाकरे हे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर काँग्रेसचे सुरेश माने हे पिछाडीवर आहेत. मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर आघाडीवर असून झिशान सिद्दीकी आणि बंडखोर तृप्ती सावंत पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख आघाडीवर तर शिवसेनेचे सचिन देशमुख पिछाडीवर, लातूर शहरमधून अमित देशमुख आघाडीवर तर भाजपचे शैलेश लाहोटी पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वर्सोवा मतदारसंघात भाजपच्या भारती लव्हेकर आघाडीवर असल्याचा अंदाज आहे तर अपक्ष लढणाऱ्या राजुल पटेल आणि काँग्रेसचे बलदेव खोसा पिछाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार आघाडीवर असल्याचा अंदाज पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे तर भाजप उमेदवार गोपिचंद पडळकर हे पिछाडीवर आहेत. कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर तर भाजपचे अतुल भोसले पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे. पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजीत कदम आघाडीवर तर शिवसेनेचे संजय विभूते पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे. परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे आघाडीवर तर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे पिछाडीवर असल्याचा अंदाज आहे. एक्झिट पोलमधील अंदाजानुसार भारतीय जनता पक्ष 140 जागा जिंकेल, तर शिवसेनेला 70 जागा मिळतील. दुसऱ्या बाजूला महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 32 जागा जिंकेल, तर काँग्रेसला 31 जागा मिळतील. इतर पक्ष आणि अपक्षांना 15 जागा मिळण्याची जास्त शक्यता आहे. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ गरजेचे असते. भारतीय जनता पक्ष 140 जागा जिंकून राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा समोर येण्याची शक्यता आहे. परंतु स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अवघ्या 5 जागांची आवश्यकता भासेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला इतक्या जागा मिळाल्या तर भाजप शिवसेनेला सत्तेत भागिदार करुन घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विभागनिहाय आकडेवारी मुंबई :- महायुती - 31, महाआघाडी - 04, अन्य - 1 कोकण :- महायुती - 32, महाआघाडी - 05, अन्य - 02 मराठवाडा :- महायुती - 28, महाआघाडी - 13, अन्य - 6 पश्चिम महाराष्ट्र :- महायुती - 44, महाआघाडी - 23, अन्य - 3 उत्तर महाराष्ट्र :- महायुती - 26, महाआघाडी - 10, अन्य - 0 विदर्भ :- महायुती - 49, महाआघाडी - 08, अन्य - 03 दरम्यान, भारतीय जनता पक्षाला विदर्भात सर्वाधिक (43) जागा मिळणार आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही भाजप चांगली मुसंडी मारण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपला 33 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत महायुतीत शिवसेनेपेक्षा भाजप मोठा भाऊ ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतल्या 36 जागांपैकी 16 जागा भाजपला मिळतील, तर शिवसेनेला 15 जागा मिळतील. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा राज्यातला तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला 32 जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यापैकी 16 जागा पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीला तारणार असल्याचे चित्र आहे. एबीपी माझा सी वोटर एक्झिट पोलमध्ये 41 हजार 146 मतदारांशी चर्चा करुन त्यांची मते जाणून घेण्यात आली. राज्यातल्या सर्व 48 लोकसभा मतदारसंघातल़्या 288 विधानसभा मतदारसंघात ही मतदानोत्तर जनमतचाचणी घेण्यात आली. एक्झिट पोल किंवा मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजे मतदान करुन मतदानकक्षाबाहेर पडलेल्या मतदारांशी पहिल्या पंधरा-वीस मिनिटांमध्ये चर्चा करुन त्याची मते जाणून घेतली जातात, त्यावरुन त्यांचा कल जाणून घेतला जातो. साधारणपणे मतदान केल्यानंतरच्या पहिल्या पंधरा-वीस मिनिटात मतदार खोटं बोलत नाही किंवा तो जो चर्चा करतो त्यावर त्याने केलेल्या मतदानाचा किंवा मतदान करताना केलेल्या विचारांचा प्रभाव कायम असतो, यामुळेच सर्वसाधारण जनमत चाचणीऐवजी मतदानोत्तर जनमतचाचण्यांची आकडेवारी निकालाच्या अधिक जवळ जाणारी मानली जाते. एबीपी माझा सी वोटरच्या या मतदानोत्तर जनमत चाचणीत मार्जिन ऑफ एरर हा मॅक्रो लेवलवर + - 3% तर मायक्रो लेवलवर + - 5% असेल, असं गृहित धरलंय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sanjay Raut Shiv sena : गिरीश महाजन स्वतः ला बाहुबली समजतात, राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Krishnaraj Mahadik on Kolhapur Election :कोणता वॉर्ड ठरला, निवडणूक लढवण्याचं ठरलंय? कृष्णराज महाडिक म्हणाले..
Sayaji Shinde On Beed Fire : देवराई प्रकल्पातील झाडांना आग, सयाजी शिंदेंनी व्यक्ती केली नाराजी
Vijay Wadettiwar Mumbai : मनसेसोबत आघाडी करणार का? विजय वडेट्टीवार थेटच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Kolhapur : हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
हुपरीत 25 लाखांची बनावट दारू जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
उन्नाव बलात्कारातील दोषीची जन्मठेप स्थगित, पीडित कुटुंबीयांनाच पोलिसांकडून मारहाण; आदित्य ठाकरेंचा संताप
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन, पोलीस अधीक्षकांनी गाव गाठलं; मृत्युचं कारण समोर
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
'मी अन् मुलगी घरात अडकलोय..' मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला लागली आग; पोस्ट शेअर करत मदत मागितली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 डिसेंबर 2025 | गुरुवार 
Embed widget