एक्स्प्लोर

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांची नात आहे, चांगली खनकावेल, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंवर हल्ला

Jayashree Thorat on Sujay Vikhe, संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली.

Jayashree Thorat on Sujay Vikhe, संगमनेर : "कोणाची टिंगल करत आहात. मी थोरात साहेबांची मुलगी आहे. संयम राखू शकते. पण लक्षात ठेवा, मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांची नात सुद्धा आहे. चांगली खनकावू पण शकते", अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat ) यांनी माजी खासदार सुजय विखेंवर (Sujay Vikhe) हल्लाबोल केलाय. जयश्री थोरात यांची युवा संवाद यात्रा घुलेवाडी येथे पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. 

ही राजकन्या आता जनकन्या झाली आहे

जयश्री थोरात म्हणाल्या, जर बोलायचं असेल तर शिस्तीत बोलायचं. मला राजकन्या म्हणाले. माझं नामकरण चाललं आहे. पण ही राजकन्या एसीमध्ये आरामात बसू शकत होती. मुंबईला आरामात हॉस्पिटलमध्ये बसू शकत होती. चांगला पगार होता. पण साहेबांनी मला या तालुक्याची जबाबदारी दिली. या तालुक्याने मला प्रेम दिलं. ही राजकन्या आता जनकन्या झाली आहे. मी लढणार आहे. मी ठरवलेलं आहे. झाशीच्या राणी सारखं माझं बाळ बांधून लढायची वेळ आली तरी बाह्यशक्ती विरोधात मी लढणार आहे. आपण त्यांना संगमनेर तालुक्याची ताकद दाखवून देऊ. 

स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आमच्या तालुक्याला आहे

पुढे बोलताना जयश्री थोरात म्हणाल्या, तुम्हाला यायचं असेल तर स्वागत आहे. मात्र, आमच्या संगमनेर तालुक्याचं वाईट करायचं नाही. नुकसान करायचं नाही. वाटोळं करायचं नाही. आमचा संगमनेर तालुका ही एक ताकद आहे. आमचा स्वाभिमानी तालुका आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आमच्या तालुक्याला आहे. तुम्हाला येथून परत लावून दिल्याशिवाय राहणार नाही. जनसामन्यांची ताकद परत पाठवणार आहे. आपल्याला एकजुटीने राहायचं आहे. कोणाला आपल्याला तोडू द्यायचं नाही. साहेबांना जे मतदान करायचं आहे. त्याने समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. 

बाळासाहेब थोरात म्हणाले, 40 वर्ष मी सभा करतोय. मतही तुम्ही चांगली होती. पण आज एक उत्साह दिसत आहे, चैतन्य दिसत आहे. आपल्या यात्रेचे दिवस वाढत चालले. डिमांड वाढत चालली आहे. मी एवढ्या निवडणुका जिंकल्या मंत्री झालो. तरीही आजवर माझं असं स्वागत झालं नव्हतं. काहीही असलं तरी तुम्ही मंडळी खूप प्रेम करणारी आहात.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray: रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत साखरपुडा; प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शनSpecial Report Worli Vidhan Sabha  : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्याZero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Happy Birthday Raveena : तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर; एकासोबत साखरपुडा पण प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्री रवीनाचं टोकाचं पाऊल, डिप्रेशनचाही शिकार
तीन दिग्गज अभिनेत्यांसोबत अफेअर, एकासोबत साखरपुडा; प्रेमात धोका मिळाल्यावर अभिनेत्रीचा आत्महत्येचा प्रयत्न
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
राज्यात पोलीस अलर्ट, 24 तासांत 52 कोटींची रोकड जप्त; निवडणुक काळात कारवाई जोमात
Shadashtak Yog : दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
दिवाळीआधीच 'या' 3 राशींवर संकटांचे ढग; पाण्यासारखा बरबाद होणार पैसा, खर्च-कर्ज वाढणार
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
अबब... सोनं-नाणं, बंगला, शेअर्स, प्रताप सरनाईक यांच्या संपत्तीत 128 कोटींची वाढ; 5 वर्षांपूर्वी किती होती मालमत्ता?
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
लोकसभेला भाजपात गेले, विधानसभेला पुन्हा शिवसेनेत; 6 महिन्यांतच गावितांची बदलली भूमिका
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
Aawadiche Khane Rajkiya Tanebane:Amit Thackeray सोबत 'आवडीचे खाणे आणि राजकीय ताणेबाणे'दिलखुलास गप्पा
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मनसेची 4 थी यादी जाहीर, श्वेता महालेंविरुद्ध उमेदवार; पुणे, मुंबई, बीड अन् कोल्हापुरात उतरवले शिलेदार
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
मोठी बातमी ! दिल्लीतून फोन आला, जिथं आक्रोश होता, तिथं जल्लोष सुरू झाला; दिलीप मानेंची उमेदवारी जाहीर
Embed widget