राज्यात बनावट औषध पुरवठ्याचा सुळसुळाट; शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह, तपासात धक्कादायक माहिती उघड
नागपूर येथील शासकीय रुग्णालयास पुरवलेल्या औषधांचा साठा बनावट असल्याचे स्पष्ट होताच विशाल एंटरप्राइजेस कंपनीसह सुरत, ठाणे आणि भिवंडी येथील औषध पुरवठादारावर नागपूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.
Fake Medicine Controversy Case : नागपूर, वर्धा, भिवंडी आणि आता अंबाजोगाईसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषध पुरवठ्याच्या घटना उघडकीस येत असून औषध पुरवठ्यात होणाऱ्या बोगसगिरीची भांडाफोड झाली आहे. या प्रकरणात मोठे आंतरराज्यीय रॅकेट असण्याची शक्यता असून शासकीय रुग्णालयांमध्येच बोगस औषधांचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. मागच्या पंधरा महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप प्रशासनाच्या हाती काहीच कसे लागले नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय?
अंबाजोगाई प्रमाणेच नागपूर येथील शासकीय रुग्णालयास पुरवलेल्या औषधांचा साठा बनावट असल्याचे स्पष्ट होताच कोल्हापूर मधल्या विशाल एंटरप्राइजेस कंपनीसह सुरत ठाणे आणि भिवंडी येथील औषध पुरवठादार आणि वितराकावर नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या विशाल एंटरप्राइजेस ने मात्र गोळ्याच्या उत्पादन करणाऱ्या कंपनीनीच दोषी असल्याचे तपासात म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला 6 लाख 92 हजार बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुरवठादार कंपनीची विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. रिक्लॅव्ह 625 ही अँटीबायोटीक औषधं रुग्णालयाला पुरवली आणि रुग्णालयानं ही औषध रुग्णांना वाटप सुद्धा केली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी चार कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, 21 ऑगस्ट 2023 ला अन्न व औषध प्रशासनानं 21 ऑगस्ट 2023 ला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या औषध भांडारातून औषधांचे काही नमुने तपासणीसाठी गोळा केले होते. हे नमुने मुंबईतल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्या औषधांचा अहवाल 31 जुलै 2024 ला अन्न व औषध प्रशासनाच्या प्रादेशिक कार्यालयाला प्राप्त झाला असून हे औषधं बनावट असल्याचं समोर आलं होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक नितीन भांडारकर यांनी अजनी पोलिसांत 2 ऑक्टोबरला तक्रार दिली होती. त्यानंतर चार कंपन्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये कोल्हापुरातील विशाल एन्टरप्रायजेसचे सुरेश पाटील, सुरतची फार्मासिक्स बायटच्या प्रीती त्रिवेदी, भिवंडीतील अक्व्हाटीक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मिहिर त्रिवेदी आणि मीरा रोडवरील काबिज जेनरिकचे संचालक विजय शैलेंद्र चौधरी या आरोपींचा समावेश असून यापैकी विजय चौधरी आणि मिहिर त्रिवेदी आधीच मार्च 2023 मध्ये नागपूर जिल्ह्यात कळमेश्वर येथे दाखल झालेल्या अशाच प्रकरणात तुरुंगात आहे.
वर्धा जिल्ह्यात ४ ऑगस्टला असाच प्रकार पुढे आला होता. वर्ध्यात अँजिमसिन नावाचे बनावट 1 लाख 80 हजार टॅब्लेट जप्त करण्यात आले होते. वर्धा अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई होती. प्रकरण उघडकीस येण्याच्या आठ ते दहा महिन्यापासून रुग्णांना बनावट टॅब्लेट दिली जात होती. जिल्हा सामान्य रुग्णालय यांनी एप्रिल महिन्यात 6 लाख 30 हजार टॅब्लेट खरेदी केली होती. अशाच प्रकारे भिवंडी आणि सुरत येथील मरिस्टॉ फॉर्म्युलेशन कंपनीचा बनावट अजिमसिन टॅब्लेटचा पुरवठा केला होता. त्या प्रकरणात वर्ध्याच्या 10 लाखांचा मुद्देमाल FDA कडून जप्त केला होता.
हे ही वाचा
- काँग्रेसचे नेते मातोश्रीवर, शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; मविआच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना