काँग्रेसचे नेते मातोश्रीवर, शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन; मविआच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना
Shivsena UBT and NCPSP MLA: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोलेंचं नाव शपथविधीसाठी घेताच सभागृहातून बाहेर पडले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई : मरकडवडी येथे गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने नागरिकांनी बॅलेट पेपर वरती स्वतःच मतदान करण्याचा ठरवले असून स्वतःचे प्रशासन तयार केले आहे. या माध्यमातून खरच किती मतं गेली आहेत, याचे रिचेकिंग करण्याचे निर्णय नागरिकांनी घेतला. असे असताना इलेक्शन कमिशनने यावरती बंदी घातली आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि यातूनच अटक सत्र सुरू झाले. कारण त्यांच्या मनात भीती होती की मरकडवडीवची आग ही संपूर्ण महाराष्ट्रात लागेल. अशी टीका करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या 288 आमदारांच्या शपथविधीसाठी आज शनिवारपासून सुरु झालेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शपथविधीवरच बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येताना दिसले. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह मविआचे नेते आज मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती पुढे आली असून मविआच्या आमदारांना शपथ घेण्याच्या सूचना केल्याचीही माहिती यांनी दिली असून या प्रकरणी भाष्य केलं आहे.
अबू आझमी रागात बोलले असतील, आम्ही चर्चा करू- जितेंद्र आव्हाड
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे बोलणं झालं असून त्याच्यातून असं सांगण्यात आले की उद्या शपथ घ्यावी आणि नंतर आंदोलनाची दिशा ठरवावी. त्यामुळे वरिष्ठ नेते निरोप देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे काय करायचं ते ठरवू, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आदेश शिवसैनिकांना दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) प्रचंड नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अबु आझमी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या (Vidhan Sabha Adhiveshan) पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया देत अबू आझमी हे रागात बोलले असतील, त्यांच्याशी आमचे वरिष्ठ चर्चा करून मार्ग काढतील, अशी स्पष्टोक्ती दिली आहे.
दरम्यान, शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गुलाबराव देवकर यांना ठीक वाटत असेल तर त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली असेल. मी त्यांच्यावर काय बोलणार. मी त्यांचं ट्विट आणि प्रतिक्रिया बघितली नाही, मग त्यावर काय बोलणार. बाहेर पडला आज ते बोलत आहेत आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू द्या, मग त्यावर प्रतिक्रिया देऊ, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अधिक बोलणे टाळले आहे.
आणखी वाचा