एक्स्प्लोर

दुग्धव्यवसायात महिलांची गरुडभरारी, 14000 सभासद 48000 लिटर दुधाचं संकलन, महिला करतायेत लाखो रुपयांची उलाढाल

शेती, दुग्धव्यवसाय यासारख्या कामात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे योगदान वाढत आहे.

Dairy Farming: शेती, दुग्धव्यवसाय यासारख्या कामात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे वाढते योगदान पाहता आता उत्तर प्रदेश सरकारनेही महिलांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. सरकारच्या प्रोत्साहानामुळं गोरखपूर विभागात महिलांच्या आत्मनिर्भरतेचे नवे पर्व सुरु केले आहे. दूध व्यवसायाच्या माध्यमातून या भागातील महिलांनी लाखो रुपयांची कमाई केली आहे. श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीच्या माध्यमातून महिला मोठी उलाढाल करत आहेत.

400 गावांतील 14000 हून अधिक महिला सभासद

बुंदेलखंडच्या बालिनी मिल्क प्रोड्युसर कंपनीच्या धर्तीवर या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. मंडळाच्या 400 गावांतील 14,000 हून अधिक पशुपालक महिला श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीमध्ये सभासद (भागधारक) झाल्या आहेत. ही कंपनी दोन वर्षांपूर्वी स्थापन झाली होती.  या महिला सदस्यांच्या माध्यमातून दररोज 48 हजार लिटर दूध संकलित करुन स्वावलंबी झाल्या आहेत. येत्या दोन वर्षांत ही महिला दूध उत्पादक कंपनी दररोज तीन लाख लिटर दूध संकलन करू शकणार आहे.

एका वर्षात 10 लाखांहून अधिक कमाई

राजकुमारी देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2023 मध्ये, उत्तर प्रदेश राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाद्वारे वित्तपुरवठा केलेल्या श्री बाबा गोरखनाथ कृपा मिल्क प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या सदस्यांनी राजकुमारीची भेट घेतली. पशुपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नावर चर्चा केली. पशुपालनात उत्पादित होणारे दूध त्यांच्या गावातूनच खरेदी केले जाईल आणि त्यासाठीचे पैसे त्यांच्या बँक खात्यात पाठवले जातील, असे सांगितले. कुटुंबाच्या संमतीने राजकुमारी या डेअरीच्या सदस्या झाल्या. त्या सध्या  15 गायींच्या दुधाच्या माध्यमातून वर्षभरात 10 लाख 31 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.  

दररोज 48000 लिटर दुधाचे संकलन

गोरखपूरमध्ये 2022 मध्ये श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे कार्यक्षेत्र विभागातील चार जिल्ह्यात आहे. यामध्ये गोरखपूर, महाराजगंज, देवरिया आणि कुशीनगर यांचा समावेश आहे. या अल्पावधीत या कंपनीत चार जिल्ह्यांतील 400 गावांतील 14 हजारांहून अधिक महिला भागधारक झाल्या आहेत. दररोज 48 हजार लिटर दूध संकलन करत आहेत. या कंपनीने कॅम्पियरगंज, खजनी, गोरखपूरचे बरहालगंज, देवरियाचे रुद्रपूर, पाथरदेव, भाटपार आणि कुशीनगरच्या कास्या येथे दूध शीतकरण केंद्रेही उघडली आहेत. जिथे गावातील सदस्य महिलांनी गोळा केलेल्या दुधावर प्रक्रिया केली जाते.

महिला पशुपालकांना जोडण्याची मोहीम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाधिक पशुपालक महिलांना भागधारक बनवण्याच्या आणि दूध संकलन वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. मार्च 2025 पर्यंत विभागातील 500 गावांमध्ये भागधारकांची संख्या किमान 20,000 असेल आणि दूध संकलन दररोज 70,000 लिटर होईल, अशी अपेक्षा आहे. येत्या दोन वर्षांत दूध संकलन दररोज 300,000 लिटरपर्यंत वाढेल अशा कृती आराखड्यावर कंपनी काम करत आहे. 

वर्षभरात 431 महिला लाखपती 

 श्री बाबा गोरखनाथ कृपा दूध उत्पादक कंपनीच्या भागधारक बनून महिला स्वावलंबी झाल्या आहेत. दुग्धोत्पादन आणि संकलनात सहभागी होऊन ते उत्पन्न मिळवू शकतात आणि कौटुंबिक उत्पन्न वाढवू शकतात. एका वर्षात कंपनीच्या 431 महिला भागधारक लखपती दीदी झाल्या आहेत. या सर्वांना एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. एका वर्षात 12 लाख रुपये कमावलेल्या दोन महिला आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Update | नागपुरातील हिंसारग्रस्त परिसर वगळता नागपुरातील जनजीवन सामान्य,वाहतूक सेवा नियमितपणे सुरुSunita Williams & Butch Wilmore returns : अखेर ९ महिन्यांनंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 7 AMABP Majha Marathi News Headlines 630 AM TOP Headlines 630AM 19 March 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Embed widget