एक्स्प्लोर

Richest families : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर, मुकेश अंबानी कितव्या क्रमांकावर?  

जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत वॉल्टन कुटुंबाने पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे.

Richest families 2024 : जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची यादी जाहीर झाली आहे. या यादीत वॉल्टन कुटुंबाने पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. ब्लूमबर्गच्या जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबे 2024 या यादीनुसार, वॉल्टन कुटुंबाची एकूण संपत्ती 432.4 अब्ज डॉलर झाली आहे. ही संपत्ती एलन मस्क आणि अनेक मध्य-पूर्व राजघराण्यांच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा जास्त आहे.

वॉल्टन कुटुंबाबाबतची माहिती

वॉल्टन कुटुंबाची ही संपत्ती वॉलमार्टच्या 46 टक्के शेअर्समधून आली आहे. वॉलमार्ट ही जगातील सर्वात मोठी रिटेलर आहे, ज्याने गेल्या आर्थिक वर्षात 648.1 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. वॉलमार्टच्या शेअर्समध्ये यावर्षी 80 टक्के वाढ झाली आहे, ज्यामुळे कुटुंबाची संपत्ती 172.7 अब्ज डॉलरने वाढली आहे. याचा अर्थ वॉल्टन कुटुंब दररोज 473.2 दशलक्ष डॉलर आणि दर मिनिटाला 3,28,577 डॉलर कमवत आहे.

जगातील 5 सर्वात श्रीमंत कुटुंबांची माहिती

वॉल्टन कुटुंब (अमेरिका):  432.4 अब्ज डॉलर संपत्तीसह पहिले स्थान. कुटुंबाच्या तीन पिढ्या वॉलमार्ट चालवतात, ज्याची जगभरात 10,600 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत.

अल नाह्यान फॅमिली (UAE): 323.9 अब्ज डॉलर मालमत्तेसह दुसरे स्थान. हे कुटुंब संयुक्त अरब अमिरातीचे राजघराणे आहे. शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या नेतृत्वाखाली हे कुटुंब आहे. कुटुंबाची संपत्ती प्रामुख्याने तेल उद्योगाशी निगडीत आहे आणि अबू धाबीच्या शेअर बाजारात त्यांच्या व्यवसायांचा वाटा 65 टक्के आहे.

अल थानी कुटुंब (कतार) : 172.9 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसरे स्थान आहे. हे कुटुंब कतारच्या राजघराण्यातील आहे आणि त्यांची संपत्ती तेल आणि वायूच्या अफाट साठ्यातून आली आहे. त्याच्या व्यवसायांमध्ये हॉटेल, विमा कंपन्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय मालमत्तांचा समावेश आहे.

हर्मेस फॅमिली (फ्रान्स) :  170.6 अब्ज डॉलरसह मालमत्तेसह चौथे स्थान. या कुटुंबाकडे फ्रान्सचा प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Hermès आहे. ज्यामध्ये सहा पिढ्या आणि 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत.

कोच कुटुंब (अमेरिका) : 148.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचवे स्थान आहे. हे कुटुंब अमेरिकेतील तेल उद्योगाशी संबंधित आहे.

भारतीय कुटुंबांची क्रमवारी

अंबानी कुटुंब : 99.6 अब्ज डॉलर संपत्तीसह 8व्या क्रमांकावर आहेत. अंबानी कुटुंबाच्या तीन पिढ्या रिलायन्स इंडस्ट्रीज चालवतात, जी वेगाने विस्तारत आहे.

मिस्त्री कुटुंब:  41.4 अब्ज डॉलर संपत्तीसह 23 व्या क्रमांकावर आहे. मिस्त्री कुटुंबीय पाच पिढ्यांपासून शापूरजी पालोनजी ग्रुपचे नेतृत्व करत आहेत.

जागतिक अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत वाढ

ब्लूमबर्गच्या अहवालात असे दिसून आले आहे की 2024 मध्ये जगभरातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती  406.5 अब्ज डॉलरने वाढली आहे. वॉल्टन कुटुंबाचे हे वाढते वर्चस्व आणि भारतीय कुटुंबांची क्रमवारी हे स्पष्ट करते की जागतिक स्तरावर आर्थिक शक्तीचे केंद्र सतत बदलत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 28 March 2025Job Majha : Agricultural Scientists Recruitment Board मध्ये नोकरीची संंधी, शैक्षणिक पात्रता काय?100 headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 28 March 2025Kunal Kamra Update : येत्या ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
मुंबईत मोकळा श्वास, आणखी एक पर्यटनस्थळ; गुढी पाडव्याला नेचर वॉक वे सुरू होणार
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
होय, अपहरण केलं, त्यासाठी स्विफ्ट भाड्यानं घेतली; सुदर्शन घुलेचा जबाब ABP माझाच्या हाती, सांगितली संपूर्ण स्टोरी
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Embed widget