(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IIFL Finance : आयआयएफएल फायनान्सला आरबीआयचा दणका, गोल्ड लोन वितरणावर बंदी
RBI Action On IIFL Finance Gold Loan : आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला नवीन गोल्ड लोन वाटप न करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या निर्णयामुळे जुन्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
RBI Action On IIFL Finance : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आयआयएफएल फायनान्सला (IIFL Finance) दणका देत त्याविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आरबीआयने आयआयएफएल फायनान्सला गोल्ड लोन (Gold Loan) वितरणावर बंदी घातली आहे. असं असलं तरीही कंपनी तिच्या सध्याच्या गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा सुरू ठेवेल. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचा जुन्या ग्राहकांवर काही परिणाम होणार नाही.
स्पेशल ऑडिटनंतर जर समाधानकारक निकाल आल्यास IIFL फायनान्सला दिलासा दिला जाऊ शकतो असे आरबीआयने म्हटले आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेनंतर एका महिन्यात आरबीआयची ही दुसरी मोठी कारवाई आहे.
Action against IIFL Finance Limited under Section 45L(1)(b) of the Reserve Bank of India Act, 1934https://t.co/8B9sNWKicG
— ReserveBankOfIndia (@RBI) March 4, 2024
या नियमांचे उल्लंघन होत होतं
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 अंतर्गत आरबीआयने ही कारवाई केली आहे. आयआयएफएल फायनान्सला तत्काळ प्रभावाने कोणतेही गोल्ड लोन मंजूर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 31 मार्च 2023 पर्यंत कंपनीच्या आर्थिक स्थितीच्या तपासणीदरम्यान, गोल्ड लोन वितरणामध्ये अनियमितता आढळून आली आहे.
गोल्ड लोन वितरण आणि लिलावादरम्यान कंपनी सोन्याची शुद्धता आणि वजन याबाबत योग्य अहवाल देत नव्हती. याशिवाय कर्ज ते मूल्य गुणोत्तराचेही उल्लंघन होत होते. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, आयआयएफएल फायनान्स कर्ज वितरण आणि वसुली दरम्यानही नियमांपेक्षा जास्त रोखे वापरत आहे. याशिवाय ग्राहकांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतही पारदर्शकता ठेवली जात नव्हती.
ग्राहकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो
या सर्व पद्धतींचा IIFL फायनान्सच्या ग्राहकांच्या हितावर परिणाम होत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या अधिकाऱ्यांसह आरबीआय या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यामध्ये काही सुधारणा होत नसल्याने आरबीआयने आता कारवाई केली आहे.
RBI directs IIFL Finance Limited to stop sanctioning or disbursing gold loans or assigning/ securitising/ selling any of its gold loans.
— All India Radio News (@airnewsalerts) March 4, 2024
RBI says the company can, however, continue to service its existing gold loan portfolio through usual collection and recovery processes.… pic.twitter.com/d6cRrocXbO
ही बातमी वाचा: