(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Small Savings Scheme Interest Rate: छोटी बचत मोठा फायदा; दुसऱ्या तिमाहीसाठी या योजनांमधील व्याज दरात वाढ
Small Savings Scheme Interest Rate: केेंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याज दरात वाढ केली आहे.
Small Savings Scheme Interest Rate: भविष्य निर्वाह निधीसह छोट्या बचत योजनांच्या व्याजदरातील बदलाची प्रतीक्षा अखेर शुक्रवारी संपली. अर्थ मंत्रालयाने दुसऱ्या तिमाहीसाठी काही लहान बचत योजनांच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा लाखो गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने व्याज दरात 0.30 टक्क्यांची वाढ केली आहे.
अर्थ मंत्रालय लघु बचत योजनांच्या (Small Savings Scheme) व्याजदरांबाबत विस्तृत चर्चा केल्यानंतर निर्णय घेते. या निर्णयाबद्दल अधिसूचना जारी करते. लहान बचत योजनांसाठी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
या ठेवींवर होणार परिणाम
अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे कोणत्याही योजनेत आधीपासून केलेल्या ठेवींवर आणि पहिल्या तिमाहीत केलेल्या नवीन ठेवींवर परिणाम होईल. या ठेवींवर जुलै ते सप्टेंबरसाठी निश्चित केलेले व्याजदर लागू होतील. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात सुमारे 4.39 लाख कोटी रुपयांचे सरकारी रोखे जारी केले होते. या आर्थिक वर्षातील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी, सरकारला लहान बचत योजनांसाठी 4.71 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सरकारी रोखे (G-Sec) जारी करायचे आहेत.
नवीन व्याज दर असे असणार
अशा प्रकारे निश्चित होतात व्याजदर
लहान बचत योजनांचे व्याजदर सरकारी रोख्यांच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. एस. गोपीनाथ समितीच्या शिफारशींच्या आधारे सरकार 2016 पासून त्याचे पालन करत आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate / NSC), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund / PPF), किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra / KVP), सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samridhhi Account / SSA) यांसारख्या लहान बचत योजनांचे व्याज दर हे ठरवले जातात.
पहिल्या तिमाहीत झाला हा बदल
यापूर्वी, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून 2023 साठी फक्त एका लहान बचत योजनेचे व्याजदर बदलण्यात आले होते. त्यानंतर सरकारने 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याज 0.70 टक्क्यांनी वाढवून 7.7 टक्के केले होते. ही सलग तिसरी तिमाही होती, जेव्हा एका किंवा दुसर्या छोट्या बचत योजनेचे व्याज वाढले होते. या बदलापूर्वी ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर सर्वाधिक 8.2 टक्के व्याज मिळत होते.