एक्स्प्लोर

सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध, अत्याधुनिक RTMS तंत्रज्ञानाद्वारे उपचार आता अकोल्यात

सन्मित्र मानस हॉस्पिटल आणि रिहॅब सेंटर, अकोला यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.

अकोला, 21 डिसेंबर : मानसिक आरोग्य ही आजच्या काळात एक महत्त्वाची समस्या ठरत आहे. अनेकांना मानसिक आजारांवर योग्य उपचार मिळत नाहीत किंवा आर्थिक अडचणींमुळे ते उपचार घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत सन्मित्र मानस हॉस्पिटल आणि रिहॅब सेंटर, अकोला यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत मानसिक आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना मानसिक आजारांवर दर्जेदार आणि मोफत उपचार घेण्याची संधी मिळणार आहे.

सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार दिले जात आहेत. त्यामध्ये मारपीट करणे, बडबड करणे, गंभीर मानसिक समस्या, उदासीनता, चिंता, सतत हात धुण्याची सवय (OCD), डोकेदुखी (मायग्रेन), आकडीचे झटके (सफट्स), फोबिया आणि भ्रम यांसारख्या आजारांचा समावेश आहे. पेशंट भरती असतांना औषधे, गोळ्या, रक्त तपासणी, राहणे, खाणे पिणे, शॉक ट्रीटमेंट इत्यादी कोणताही खर्च लागत नाही हे सर्व उपचार महात्मा फुले योजनेअंतर्गत मोफत दिले जात असल्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक RTMS तंत्रज्ञानाचा वापर करून काही गंभीर मानसिक आजारांवर उपचार केले जात आहेत. रिपेटिटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन (RTMS) ही एक नॉन-इन्व्हेसिव्ह तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती असून ती उदासीनता, चिंता, OCD आणि धूम्रपानाच्या सवयीवर प्रभावी ठरते. RTMS तंत्रज्ञानामुळे मेंदूतील पेशी सक्रिय होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. विशेषतः उपचार-प्रतिरोधक (ट्रीटमेंट रेसिस्टंट) असलेल्या डिप्रेशनवर या तंत्रज्ञानाने 50 ते 60 टक्के यशस्वी परिणाम साध्य होतात. अमेरिकेच्या FDA मान्यतेने हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे सिद्ध झाले आहे.

सन्मित्र मानस हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना कोणत्याही अडचणीशिवाय मोफत उपचार उपलब्ध होतील. सन्मित्र मानस हॉस्पिटल, रवीदास प्लॉट, अकोला येथे केळकर हॉस्पिटलजवळ हे उपचार केंद्र कार्यरत आहे. अधिक माहितीसाठी रुग्णांनी +९१ ७०३०४१४१४० किंवा +९१ ८८०५०९७२२७ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, अधिक माहिती व अपडेट्ससाठी हॉस्पिटलची अधिकृत वेबसाइट learn.mmdrkelkar.com, तसेच डॉ. केळकर यांचा यूट्यूब चॅनेल आणि इंस्टाग्राम पेज भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सन्मित्र मानस हॉस्पिटलच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देऊन आयुष्याकडे सकारात्मक पाऊल टाका. मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे आणि सन्मित्र मानस हॉस्पिटल तुमच्यासोबत आहे, तुमच्या आरोग्याच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे.

अधिक पाहा..

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget