एक्स्प्लोर

September Lucky Zodiacs : सप्टेंबर महिना मेषसह 5 राशींसाठी ठरणार खास; लक्ष्मी योगामुळे नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

Horoscope September 2024 Top 5 Lucky Zodiac Sign : सप्टेंबर महिन्यात बुधादित्य योग आणि लक्ष्मी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्याचा फायदा मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Monthly Horoscope September 2024 : सप्टेंबर महिन्यात एकाच वेळी दोन प्रभावी राजयोग तयार होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजेच 4 सप्टेंबरला बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करेल, जिथे सूर्य आधीच उपस्थित आहे. अशा स्थितीत, बुध आणि सूर्याच्या संयोगामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच बुधादित्य राजयोग तयार होईल. तर महिन्याच्या शेवटी लक्ष्मी योग तयार होईल. लक्ष्मी योग आणि बुधादित्य योगाच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिना मेष आणि कुंभ राशीसह 5 राशींसाठी फायदेशीर राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या

मेष रास (Aries September 2024 Monthly Horoscope)

सप्टेंबर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी आनंदी राहील. या महिन्यात तुम्हाला नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. या महिन्यात व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक संधी मिळतील. परंतु, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. या महिन्यात तुम्हाला कामासाठी खूप प्रवास करावा लागू शकतो, हे प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

मेष राशीचे लोक जे नोकरीच्या शोधात होते, त्यांना या महिन्यात चांगली संधी मिळू शकते. जर तुमच्या कोर्टाशी संबंधित केस चालू असतील तर या महिन्यात त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळणार आहे. विवाहितांसाठी महिना चांगला राहील. तुमचा तुमच्या जोडीदारासोबत कडाक्याचा वाद होऊ शकतो.

तूळ रास (Libra September 2024 Monthly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी हा महिना आनंद आणि सौभाग्य वाढवणारा आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तसेच या महिन्यात तुम्ही नियोजित केलेली कामं वेळेवर पूर्ण होतील. तुमच्यात खूप आत्मविश्वास दिसेल. या महिन्यात तुमचा मान-सन्मान वाढेल. या महिन्यात तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. मात्र, तुमच्या कामात किरकोळ अडथळे देखील येऊ शकतात.

व्यावसायिक कामाची प्रगती थोडी मंद असेल पण, तुम्हाला फायदा होईल. या महिन्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अनेक चांगल्या संधी मिळतील. एवढंच नाही तर उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोतही सध्या निर्माण होणार आहेत. या महिन्यात तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. या महिन्यात तुम्हाला केवळ आर्थिक लाभच मिळणार नाही, तर ऐषोआरामावरही भरपूर पैसा खर्च होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना या महिन्यात इच्छित पद आणि प्रतिष्ठा मिळू शकते. वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला असेल.

वृश्चिक रास (Scorpio September 2024 Monthly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. या महिन्याची सुरुवात खूप शुभ असणार आहे. तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील. या काळात तुम्हाला व्यवसायात अपेक्षित नफाही मिळेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकेल. या महिन्यात तुम्हाला कुटुंब आणि जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. त्यांना काही मोठं यश मिळू शकतं. हा संपूर्ण महिना तुम्हाला अपेक्षित यश मिळवून देईल.

या महिन्यात तुम्ही जे काही पाऊल उचलाल ते काळजीपूर्वक उचला. सप्टेंबरचा मध्य भाग व्यावसायिकांसाठी चांगला राहील. तुम्हाला मोठा नफा मिळेल आणि व्यवसायात प्रगती होईल. मार्केटिंगशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. तुमची बुद्धी तुम्हाला संपत्ती आणि सन्मान देईल. लव्ह लाईफच्या दृष्टीकोनातून सप्टेंबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान ठरेल. तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसेल.

धनु रास (Sagittarius September 2024 Monthly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात खूप चांगली असणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी मोठा प्रस्ताव मिळू शकतो. तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्ही समाजाच्या विविध क्षेत्रात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश राहतील, ते तुमच्या कामाची प्रशंसा करतील. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल.

या महिन्यात कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. एखादी मोठी ऑर्डर किंवा मोठी डील मिळाल्याने व्यावसायिकांना चांगली रक्कम मिळेल. सप्टेंबर महिन्यात धनु राशीच्या नोकरदार लोकांना प्रमोशन वगैरे मिळू शकतं. या महिन्यात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या महिन्यात तुमची कोणाशी तरी मैत्री प्रेमात बदलू शकते. तुमचे वैवाहिक जीवन देखील आनंदी असणार आहे. महिन्याच्या मध्यात तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

कुंभ रास (Aquarius September 2024 Monthly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशी समन्वय राखणं योग्य राहील. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, जसजसा महिना पुढे जाईल तसतसे तुम्हाला चांगले लाभ मिळतील. या महिन्यात तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी मोठे पद आणि जबाबदारी मिळू शकते. तुमचा आदरही वाढेल. या राशीचे लोक जे परीक्षा स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांना काही चांगली बातमी मिळू शकते.

महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी खूप भाग्यवान असणार आहे. या काळात तुम्हाला अचानक काही मोठं यश मिळू शकतं. जमीन खरेदीत फायदा होईल. वडिलांकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या प्रेम जीवनात अनेक दिवसांपासून सुरू असलेले सर्व गैरसमज या महिन्यात दूर होतील. सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणात तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी उभा राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Virgo Weekly Horoscope 02 September To 08 September 2024 : येणारे 7 दिवस कन्या राशीसाठी अतिशय खास; ओळख वाढणार, अनपेक्षित धनलाभ होणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 05 January 2025Parbhani Somnath Suryawanshi Case | सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून 50 लाखांचे आमिषABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 05 January 2025Job Majha | सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात निम्न श्रेणी लिपिक पदावर भरती ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
धनंजय मुंडेंविरोधातील वक्तव्य भोवणार? मनोज जरांगेंच्या विरोधात परळीत गुन्हा दाखल
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलि‍सांकडून 50 लाख अन् नोकरीचं आमिष; प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत सूर्यवंशी कुटुंबियांच्या गौप्यस्फोट
Mira Road Murder : फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
फेरीवाल्यांचा वाद नव्हे तर मारहाणीचा साक्षीदार असल्यानेच हत्या, मीरा रोड प्रकरणात नवीन वळण, दोन आरोपी अटकेत
Narhari Zirwal : 288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
288 आमदारांचे सभागृह मी चालवले, तर राज्यही चालवू शकतो; मंत्री नरहरी झिरवाळांची बोलकी प्रतिक्रिया, म्हणाले..  
Amol Mitkari: महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला आमदार सुरेश धसच जबाबदार राहतील; अमोल मिटकरींचा पुन्हा हल्लाबोल 
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Embed widget