एक्स्प्लोर

BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार

आयसीसीने 2025 सालचा महिला विश्वचषक भारतात पार पडणार असल्याची माहिती दिल्यानंतर आता बीसीसीआयने याबाबत आयसीसीचे आभार मानत स्पर्धा अगदी दणक्यात पार पडणार असल्याचा निर्धार केला आहे. सचिव जय शहा तसंच अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही ट्वीट केलं आहे.

ICC Womens 2025 World Cup : महिला क्रिकेटच्या आगामी विश्वचषक सामन्यांचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केल्यानंतर यावेळी 2025 सालचा महिला विश्वचषक (ICC Womens World Cup 2025) भारतात होणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर बीसीसीआयने आयसीसीचे आभार मान ही स्पर्धा अगदी दणक्यात पार पडणार असल्याचा निर्धार केला आहे. सचिव जय शहा तसंच अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही याबाबत माहिती दिली असून बीसीसीआयने ट्वीट केलं आहे.

काय म्हणाले जय शहा?

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, 'आयसीसीने 2025 विश्वचषकाचं यजमानपद भारताला दिलं असल्याने आम्ही फार आनंदी आहोत. आम्ही कोणतीच कसर यावेळी सोडणार नाही. एक अविस्मरणीय स्पर्धा यावेळी घडवून दाखवू. महिला क्रिकेटसाठी बीसीसीआय कायम अग्रेसर राहिलं असून सर्व सोयीसुविधांच्या जोरावर एक य़शस्वी स्पर्धा आम्ही पार पाडू.'

महिला क्रिकेटला मागील काही वर्षात अगदी अच्छे दिन आल्याचं दिसून आलं आहे. भव्य स्पर्धाच नाही तर दौरे आणि महिला आय़पीएलही पार पडत आहे. अशामध्ये महिला क्रिकेटच्या आगामी भव्य स्पर्धांबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) माहिती दिली आहे. बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी 2024 पासून ते 2027 पर्यंतच्या महिला आयसीसी स्पर्धांबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावेळी भारतामध्येही स्पर्धेचं आयोजन होणार असून 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन भारतात होणार आहे. 

कसं आहे महिलांचं 2024 ते 2027 मधील वेळापत्रक?

वेळापत्रकाचा विचार करता 2024 मध्ये बांग्लादेशमध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) पार पडणार आहे. यावेळी 10 संघ स्पर्धेत सहभागी होणार असून एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच पुढील वर्षी 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषक (Womens World Cup 2025) भारतात खेळवला जाणार आहे. यावेळी 8 एकमेंकाविरुद्ध आमने-सामने असणार आहेत. तर एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच 2026 मध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 (Womens T20 World Cup 2026) इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. यावेळी 12 संघामध्ये 33 सामने खेळवले जाणार आहेत. 2027 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा (2027 Champions Trophy) खेळवली जाणार असून 6 संघामध्ये 16 सामने श्रीलंकेच्या भूमीत पार पडणार आहेत.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Special Report : पुन्हा बड्या बापाच्या पोरानं निरपराधांना उडवलंAjit Pawar Tukaram Maharaj Palakhi : अजित पवार यांच्याकडून तुकोबारायांच्या पालखीचं सारथ्यMajha Vitthal Majhi Wari : तुकोबांच्या पालखीचा काटेवाडीतील डोळ्यांची पारणं फेडणारा रिंगण सोहळाABP Majha Marathi News Headlines 10pm TOP Headlines 10pm 03 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget