Womens T20 WC Host : 2024 ते 27 दरम्यानच्या आयसीसीच्या महिला क्रिकेट स्पर्धाचं वेळापत्रक ठरलं, भारताकडेही यजमानपद, वाचा सविस्तर
ICC : आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला क्रिकेटच्या आगामी भव्य स्पर्धांची माहिती दिली असून टी20 विश्वचषकासह, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचंही आयोजन होणार आहे.
ICC Womens Cricket : महिला क्रिकेटच्या (Womens Cricket) आगामी भव्य स्पर्धांबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (ICC) नुकतीच माहिती दिली आहे. बर्मिंगहममध्ये पार पडलेल्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. यावेळी 2024 पासून ते 2027 पर्यंतच्या महिला आयसीसी स्पर्धांबद्दल माहिती देण्यात आली आहे. यावेळी भारतामध्येही स्पर्धेचं आयोजन होणार असून 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचं आयोजन भारतात होणार आहे. या सर्वाबाबत आयसीसीने ट्वीट करत माहिती दिली आहे.
The hosts for the ICC Women's tournaments between 2024-2027 have now been confirmed 🤩
— ICC (@ICC) July 26, 2022
Details 👇https://t.co/Auw0YAMRLD
वेळापत्रकाचा विचार करता 2024 मध्ये बांग्लादेशमध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 (Womens T20 World Cup 2024) पार पडणार आहे. यावेळी 10 संघ स्पर्धेत सहभागी होणार असून एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच पुढील वर्षी 2025 मध्ये एकदिवसीय विश्वचषक (Womens World Cup 2025) भारतात खेळवला जाणार आहे. यावेळी 8 एकमेंकाविरुद्ध आमने-सामने असणार आहेत. तर एकूण 31 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच 2026 मध्ये आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2026 (Womens T20 World Cup 2026) इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. यावेळी 12 संघामध्ये 33 सामने खेळवले जाणार आहेत. 2027 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा (2027 Champions Trophy) खेळवली जाणार असून 6 संघामध्ये 16 सामने श्रीलंकेच्या भूमीत पार पडणार आहेत.
हे देखील वाचा-
- T20 World Cup 2022 : भारताला मात देऊन ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक उंचावणार, रिकी पॉटिंगचं भाकित
- IND vs WI : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज, एक विजय आणि 39 वर्षांत पहिल्यांदाच करणार 'ही' कामगिरी
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी