एक्स्प्लोर

ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली

Virat Kohli : आयसीसीने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधील खेळाडूंची रँकिंग जाहीर केली, ज्यामध्ये विराट कोहलीसह कर्णधार रोहित शर्माला तोटा झाला असून त्यांची रँकिंग घसरली आहे.

Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील एक मोठं नाव, जागतिक क्रिकेटमध्ये सध्या खेळणाऱ्यांमध्ये सर्वाधिक धावा नावावर असणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). पण हाच कोहली मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झुंजत असल्याने आता त्याला गेल्या सात वर्षांतील सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारीवर जावं लागलं आहे. आयसीसीने नुकतीच एकदिवसी खेळाडूंची क्रमवारी (ICC ODI Ranking) जाहीर केली. ज्यात विराट एका स्थानावरुन घसरला असून थेट पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय भारताचा कर्णधार रोहित शर्मालाही (Rohit Sharma) एका स्थानाची घसरण झाल्याने तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

विराट-रोहित या दोघांना मागील काही काळापासून खास कामगिरी करता आलेली नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध दोघेही फ्लॉप ठरले. आता वेस्ट इंडीजविरुद्ध दोघेही विश्रांतीवर असून यामुळे त्याच्या आयसीसी रँकिंमध्ये घसरण झाली आहे. विराट कोहली 774 गुणांसह आता पाचव्या स्थानावर तर रोहित शर्मा 770 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम 892 गुणांसह आहे. दुसऱ्या स्थानावरही पाकिस्तानचा इमाम हुल् हक 815 गुणांसह आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचे डस्सेन आणि डी कॉक अनुक्रमे 789 आणि 784 गुणांसह विराजमान आहेत.

कोहलीची धावांसाठी धडपड

आयसीसी रँकिंगमध्ये पाचव्या स्थानी विराट पोहोचल्याने मागील 7 वर्षांतील ही त्यांची सर्वात खराब क्रमवारी आहे. ऑक्टोबर 2015 पासून तो टॉप 4 मधून कधीच बाहेर नव्हता. पण आता त्याला थेट पाचव्या स्थानी जावे लागले आहे. विराट कोहलीला गेल्या अडीच वर्षांत तिन्ही फॉरमेटमध्ये एकही शतक झळकावता आलं नाहीये. आयपीएलच्या पंधराव्या हंगामापूर्वी त्यानं विश्रांती घेतली. विशेष म्हणजे, आयपीएलमध्येही विराटला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं आयपीएल 2022 मध्ये एकूण 16 सामन्यात फक्त 341 धावा केल्या. दरम्यान, टी-20 विश्वचषकाला काहीच महिने शिल्लक राहिले आहेत. यामुळं विराट कोहलीचं फॉर्ममध्ये येणं भारतीय संघासाठी खूप गरजेचं आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Embed widget