एक्स्प्लोर

Akshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन

Akshy shinde funeral: ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटूनही अद्याप त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली असून आता अंत्यविधीसाठी फक्त आजचाच दिवस उरला आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदेचा (akshay shinde) अंत्यविधी राज्य सरकारला करावा लागणार आहे. त्यातच, आता उल्हासनगर (ulhasnagar) येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा अंत्यविधी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, येथील स्मशानभूमीत पोलिसांकडून (Police) खड्डा खोदण्यात आला असून येथे त्याच्या मृतदेहाचे दफन करण्यात येत आहे. मात्र, उल्हासनगर येथेदेखील अक्षय शिंदेच्या पार्थिवाचे दफन करण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे, मोठ्या पोलीस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला आहे. 

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाल्यानंतर गेल्या 6 दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत असलेल्या अक्षयच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याचे निश्चित मानले जाते. अक्षय शिंदे याचा अंत्यविधी बदलापूरमध्ये करण्यास स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी विरोध दर्शवला. त्यानंतर, अक्षयच्या कुटुंबीयांनी अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीतील जागेची सुद्धा पाहणी केली होती. मात्र, अंबरनाथमध्ये सुद्धा मनसे आणि शिवसेनेने त्याचा अंत्यविधी करण्यास विरोध दर्शवला. त्यानंतर, उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदण्यात आला. मात्र, येथेही स्थानिकांकडून विरोध होत आहे. अक्षय शिंदे याच्या दफन विधीसाठी खोदलेला खड्डा येथील कार्यकर्त्यांनी बुजवला होता, तो खड्डा पुन्हा उतरण्यासाठी जेसीबी स्मशानभूमीत आणण्यात आला. त्यानंतर, पोलिसांच्या बंदोबस्तात पुन्हा हा खड्डा खोदण्यात आला.  

दरम्यान, पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने आज अक्षयच्या आई-वडिलांना शवागृहात नेले होते. त्यानंतर, अक्षय शिंदेचा मृतदेह त्याच्या आई आणि वडिलांनी ताब्यात घेतला, त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शववाहिका उल्हासनगर दिशेने निघाली. उल्हानगरमध्ये कडक पोलिस बंदोबस्तात अक्षयच्या मृतदेहाचे दफन करण्यात येत आहे. मात्र, येथेही स्थानिकांनी स्मशानात धाव घेत अंत्यविधीला विरोध केला आहे. दरम्यान,  अक्षयच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यासाठी आता फक्त आजचा एकच दिवस उरला असून त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारला अक्षय शिंदेचा अंत्यविधी करावा लागणार आहे. त्यातच, आता उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत अक्षयच्या अंत्यविधीसाठी खड्डा खोदण्यात आला होता, तेथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. 

ठाणे व्हिडीओ

Akshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन
Akshay Shinde : उल्हासनगरच्या स्मशानभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदेचा मृतदेह दफन

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
विधानसभेची खडाजंगी: राखीव मोहोळ मतदारसंघात कुणाचं पारडं जड?; विधानसभेला कोण उधळणार गुलाल
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Embed widget