Shoaib Akhter On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: टीम इंडियाने विश्वचषक जिंकताच शोएब अख्तरचं विधान चर्चेत; म्हणाला, रोहित-विराटला बाहेर काढलं आणि आता...
Shoaib Akhter On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर आणि शाहीद आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे.

Shoaib Akhter On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या (T20 World Cup 2026) अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड (Ind vs NZ Final) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आयसीसी टी-20 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरला. भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhter) आणि शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi) प्रतिक्रिया दिली आहे.
शोएब अख्तर काय म्हणाला? (Shoaib Akhter On Ind vs NZ)
शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर टीम इंडियाच्या कामगिरीचे, ज्यामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या निवड प्रक्रियेचेही मोकळेपणाने कौतुक केले. संघाच्या रणनीतीचे कौतुक करताना अख्तर म्हणाला की, भारताने योग्यवेळी योग्य खेळाडूंना संधी दिल्या. त्याने विशेषतः संजू सॅमसनचा उल्लेख केला. संजूवर विश्वास होता आणि त्याला वरच्या क्रमात फलंदाजीसाठी पाठवणे हा एक उत्तम निर्णय होता. 15 खेळाडू निवडले जातात. खूप खेळाडू वगळले जातात. अगदी दिग्गज खेळाडूंनाही वगळले जाते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे उदाहरण घ्या...त्यांनी दोघांनाही वगळले आणि आता विश्वचषक जिंकला आहे. भारतात ज्या पद्धतीने क्रिकेट पायाभूत सुविधा बांधल्या जात आहेत ते कौतुकास्पद आहे. भारताला जर आगामी 2027 चा विश्वचषक आजच मिळत असेल तर तो त्यांनी आजच घेऊन टाकावा, असंही शोएब अख्तरने सांगितले.
भारत योग्य ठिकाणी पैसे गुंतवतो-शोएब अख्तर (Shoaib Akhter On Team India)
टीम इंडियाच्या तयारीबद्दल बोलताना अख्तर म्हणाला, भारत योग्य ठिकाणी पैसे गुंतवतो. त्यांची प्रशिक्षण केंद्रे, त्यांच्या प्रयोगशाळा आणि त्यांची उपकरणे पाहा. त्यांचे मैदान तयार करण्यासाठी आणि खेळाडूंची तंदुरुस्ती सुधारण्यासाठी ते ज्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत ते आज संपूर्ण जग पाहत आहे. नावांच्याऐवजी, गुणवत्तेच्या आधारे खेळाडूंची निवड करण्यात आली. आज भारताचे धोरण जिंकले, त्यांची व्यवस्था जिंकली आणि त्यांची गुणवत्ता जिंकली, असं म्हणत शोएब अख्तरने कौतुक केले.
योग्य प्रतिभेला संधी दिली तर चांगले निकाल मिळतात-शोएब अख्तर (Shoaib Akhter On Team India)
गौतम गंभीरने दाखवून दिले की जर तुम्ही योग्य प्रतिभेला संधी दिली तर चांगले निकाल मिळतात, असं शोएब अख्तर म्हणाला. भारतीय संघात दाखवलेला समन्वय अद्भुत होता. तीन माजी कर्णधार मैदानावर एकत्र होते, एकमेकांचा आदर करत होते आणि एकत्र आनंद साजरा करत होते. यावरून संघात किती एकता आहे आणि त्यांच्या ज्येष्ठांबद्दल किती आदर आहे हे दिसून येते, असंही शोएब अख्तरने सांगितले.
🚨 Very Rare that a Pakistani praising India 😭
— 𝑨𝑻10 (@Loyalsachfan10) March 8, 2026
SHOAIB AKHTAR 🗣️ -
• India's policy won, India's System won, India's merit won.
• Praised Gautam Gambhir for picking guys on merit
• Management said good bye to Rohit and Kohli and now they won the World Cup( kya bol Raha… pic.twitter.com/GqRhsXqC29
शाहीद आफ्रिदी काय म्हणाला? (Shahid Afridi On Ind vs NZ Final)
टीम इंडिया विश्वचषक जिंकण्यासाठी पात्र होती. चांगल्या टीमसोबत टीम इंडिया विश्वचषकाच्या स्पर्धेत उतरली होती. बेंचवर बसलेल्या खेळाडूंची नावंही मोठी होती. संजू सॅमसननला सलामीवर म्हणून खेळवणं, एक चांगला निर्णय होता. तसेच संजू सॅमसननेही सिद्ध करुन दाखवलं. जसप्रीत बुमराहनेही चांगली कामगिरी केली. एकूणच विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचं अभिनंदन..., असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.
संबंधित बातम्या:




















