एक्स्प्लोर

Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ, हीन दर्जाची वागणूक, आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...; डॉ. मनीषा जेजुरकरांच्या भावानं सगळंच सांगितलं

Nashik Crime News: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत एका विवाहित महिला डॉक्टरने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nashik Crime News: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातील उच्चभ्रू वसाहतीत एका विवाहित महिला डॉक्टरने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉ. मनीषा निलेश जेजुरकर (Dr Manisha Jejurkar) असे मृत महिलेचे नाव असून, त्या स्वतः डॉक्टर असल्याने या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेचे पती डॉ. निलेश जेजुरकर (Nilesh Jejurkar) हे नाशिक जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. पती-पत्नीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या कौटुंबिक वादातूनच डॉ. मनीषा जेजुरकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी डॉ. निलेश जेजुरकर यांच्या विरोधात नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या भावाने निलेश जेजुरकर यांच्याबाबत गंभीर आरोप केलेत. 

डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या भावाने एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, सहा तारखेला ही घटना घडली, त्या दिवशी बारा वाजेच्या सुमारास आम्हाला बहिणीच्या दिराचा फोन आला. त्यानंतर तिच्या सासर्‍यांचा फोन आला आणि त्यांनी आम्हाला कळवले की, माझ्या बहिणीने आत्महत्या केली. आम्ही ताबडतोब घटनास्थळी पोहोचलो. ही आत्महत्या दिसत असली तरी आम्हाला शंका आहे की, तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. 

Nashik Crime News: निलेश जेजुरकरांकडून माझ्या बहिणीचा दोन वर्षांपासून छळ

ती कधीही आत्महत्या करू शकत नाही. तिला मी खूप वर्षांपासून ओळखतो. माझी बहीण तिच्या मुलींची, तिच्या नवऱ्याची किती काळजी घ्यायची हे सर्वांना माहिती होतं. त्यामुळे ती स्वतः आत्महत्या करणार नाही. यामागे खूप मोठा हात आहे. त्यामुळे आम्ही मुख्य आरोपी म्हणून निलेश जेजुरकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. निलेश जेजुरकर हे माझ्या बहिणीचा मानसिक छळ करत होते. ही एक दोन महिन्यांची गोष्ट नाही तर मागच्या दीड ते दोन वर्षांपासून हे सुरू होते. या घटनेमागचे मुख्य आरोपी निलेश जेजुरकरच आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. 

Nashik Crime News: माझ्या बहिणीला हीन दर्जाची वागणूक

पती-पत्नीमध्ये काही वाद होत होते का? याबाबत विचारले असता डॉ. मनीषा जेजुरकर यांचे भाऊ म्हणाले की, वाद एकाच बाजूने होत होते. माझ्या बहिणी सोबत राहणे त्यांना आवडत नव्हते. माझ्या बहिणीला ते हीन दर्जाची वागणूक द्यायचे.  माणूस म्हणून सुद्धा त्यांनी तिला वागवले नाही. तिला तुच्छ लेखत होते. तिच्या शिक्षणाचा अवमान करत होते. त्या माणसाने 24 तासात माझ्या बहिणीशी पाच मिनिटे सुद्धा कधी बोलले नाही. माझ्या बहिणीने काही चौकशी केली तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे. घरातून बाहेर निघून जाणे, असे सुरू होते. 

Nashik Crime News: आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला, पण...

आम्ही त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तिची मनस्थिती खराब होत चालली आहे. तिला हे सहन होत नाही. तिला दीड दोन वर्षांपासून त्रास होत आहे. हे तिने तिच्या दिराला, सासू-सासर्‍यांना सांगितलं. ती नेहमी आग्रह धरत होती की, तुम्ही बसा, बोला,चर्चा करा. पण, त्यांनी तिला काहीच दाद दिली नाही. आम्ही तिच्या सासू-सासर्‍यांशी संपर्क साधला. त्यांना याबाबत सांगितले, तुम्ही काहीतरी मार्ग काढा, आपण चर्चा करू, जे काही वाद असतील ते आपण मिटवू, आसे म्हटले. पण, तिच्या घरच्यांनी शेवटपर्यंत मीटिंग होऊ दिली नाही, असा आरोप देखील डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या भावाने केलाय.   

आणखी वाचा 

पती नामांकित मनोविकारतज्ज्ञ पण पत्नीच्या मनाचा थांग लागला नाही, नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकरांनी आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
Ashok Kharat & Jitendra Shelke: अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके कोण?
अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके कोण?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
Puja Sawant on Ashok Kharat: प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
प्राजक्ता माळीनंतर अशोक खरात प्रकरणी पूजा सावंतची प्रतिक्रिया चर्चेत; 'या सगळ्या भोंदूगिरीची .. '
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, एक्सवर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
Prajakt Tanpure: तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय, प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय, प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
Embed widget