Maharashtra Breaking LIVE Updates: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
Maharashtra Breaking News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking News LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Team India Champions T20 World Cup 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेटने नवा इतिहास रचला. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग दोन टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर 256 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल दाखवत किवी संघाचा पराभव केला.
जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव 159 धावांवरच आटोपला आणि भारताने 96 धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक पटकावले. हा केवळ विजय नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अभिमानाचा क्षण होता.
टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा मोठा पराभव केला आहे. भारतानं सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. संजू सॅमसहनसह अभिषक शर्मा, शिवम दुबे इशान किशन यांना शानदार प्रदर्शन केल्यामुळं भारताला 255 ही मोठी धावसंख्या अभारता आली. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 159 धावांवर आटोपला. दरम्यान, भारतीय संघाच्या विजयानंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षावर होत आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने खास शब्दात भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. पुन्हा एकदा चॅम्पियन! अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात मिळालेला विजय हा अभूतपूर्व असल्याचं कोहलीनं म्हटलं आहे.
Pune Mahapalika: पुणे महापालिकेचे तब्बल 13 हजार कोटींचे अंदाजपत्रक
पुणे महापालिकेचे तब्बल १३ हजार कोटींचे अंदाजपत्रक
पुणे महापालिका आयुक्त यांनी आज सादर केले १३ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक
महापालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 13 हजार 995 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर
पुणे शहरातील वाहतूक नियोजन आणि प्रकल्पासाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद
पुणे महापालिकेत पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक २०७७ कोटी रुपयांची तरतूद
मलनिस्सारण प्रकल्पाला १२१६ कोटी, घनकचरा व्यवस्थापन साठी १३९० कोटी तर पथ विभागाला १८६६ कोटी रुपयांची तरतूद
प्राथमिक शिक्षण विभागासाठी तब्बल ९७९ कोटी रुपयांची तरतूद
भवन रचना विभासाठी ६५० कोटी, विद्युत विभाल २६५ कोटी रुपयांची तरतूद, समाज विकासाला १४३.५० कोटी रुपये, उद्यान विभागाला २०५ कोटी, आरोग्य विभागासाठी ८८ कोटी, नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी रुपये, पर्यावरण विभागाला ५१.५९ कोटी रुपये
माहिती व तंत्रज्ञान विभागाला ५६.७३ कोटी रुपये, हेरिटेज सेल साठी २८.५० कोटी
पुणे महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाला १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद
Jalgaon Crime: जळगाव एमआयडीसीतील पोलीस कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, गळफास घेऊन आयुष्य संपवलं
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे घडली आहे. निलेश पाटील असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांनी कोदगाव येथील राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनीही ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.





















