Mumbai Local Pass : कल्याण, डोंबिवलीत रेल्वेचा पास कसा मिळवाल? ABP Majha
कोरोनामुळे सामान्यांचा लोकल प्रवासाला ब्रेक लागला होता, मात्र १५ ऑगस्टपासून तुमचा आमचा लोकल प्रवास पुन्हा सुरु होतोय. आणि त्यासाठी आजपासून क्यूआर कोड पास मिळायला सुरुवात झाली आहे. लोकल पास मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धाव घेतली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाचा पास मिळणार आहे... त्यासाठी रेल्वे स्थानकांत लशीच्या प्रमाणपत्राची ऑफलाईन पडताळणी करण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील आठ रेल्वे स्थानकांवर रेल्वेच्या पाससाठी महापालिकेचे मदत कक्ष तैनात करण्यात आलेत. तिथं कशी प्रक्रिया सुरु आहे आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिजीत देशमुख यांनी......























