Mumbai Local दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? रेल्वेत विषारी वायू सोडून घातपात करण्याचा डाव : सूत्र
मुंबई : चार दिवसांपूर्वी दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर काल मुंबईमध्ये आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच दहशतवाद्यांनी मुंबई लोकलमध्ये विषारी गॅसच्या सहाय्याने हल्ला करण्याची योजना आखल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे मुंबई लोकल स्थानकांवरच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
गुप्तचर विभागाने तशी माहिती रेल्वे पोलिसांना दिल्याचं समजतंय. या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून प्रत्येक गोष्टीची तपासणी केली जात आहे. काही महत्वाच्या रेल्वे स्थानकावरील एन्ट्री आणि एक्झिटच्या मुख्य मार्गाव्यतिरिक्त इतर सर्व रस्ते बंद केले आहेत.
दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यापैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. स्पेशल सेलला माहिती मिळाली होती की पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट दिल्ली आणि जवळपासच्या भागात स्फोट घडवण्याचा कट आखत आहेत आणि त्यांचं लक्ष्य गर्दीची ठिकाणं आहेत.
![New India Co-Oprative Bank : Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/dd5d7789b6c99a266cbc22b34947913e1739763439502718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ekanth Shinde on Delhi Result 2025 : भाजपने दिल्ली जिंकली,आता मुंबईही जिंकणार;एकनाथ शिंदे EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/08/49a7f578f8e12a539494bd041ffea6ff173900578446390_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Uddhav Thackeray on Suraj Chavan : सूरज चव्हाण निष्ठावान...सगळेच लोक बिकाऊ गद्दार होऊ शकत नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/15ae83f1132b0dbaef7d30b5be21f17c173868237728290_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/38fa284c032c1c71ff9243e9fef136c3173868170582090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/04/7028fc352972d9db641d749b3122d7d1173867727623190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)