प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा मोठा शोध असल्याचे मत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले.
Rajiv Khandekar : प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा मोठा शोध असल्याचे मत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त केले. आगामी काळात याला महत्व असणार आहे, पण त्याचे दुष्परिणाम हे गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. अंबाजोगाई येथील दैनिक वार्ताच्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. स्वागता दरम्यान फेटेवाल्याच्या फेटे बांधण्याच्या गतीला बघूनही त्यांचे मन भारावून गेले. यावेळी राजीव खांडेकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी खांडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना AI तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.
बीडचं बोलणं म्हटलं की सर्वांच्या पोटात गोळा येतो, मधल्या काही काळात झालेल्या घटनांमुळे नाव काही काळवंडल होतं. आज मला इथे सकारात्मकता जाणवत आहे. आज इथे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी आहेत असे राजीव खांडेकर म्हणाले. इथे फेटा बांधणारे पण बुमराह सारखं नजर रोखून फेटा बांधल्याचे ते म्हणाले. आजच्या प्रश्नांची सोडवणूक होऊ शकते अशा मंडळींना ऐकण्याची संधी आज परमेश्वर गित्ते यांच्यामुळे भेटल्याचे खांडेकर म्हणाले. आज अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. येणाऱ्या काळामध्ये असणार आहेत. Ai आता महत्वाचा आहे, आपण त्याला टाळू शकत नाही असे खांडेकर म्हणाले.
गुगलने बारामतीत शेतीवर प्रयोग केले
देवांग मेहता यांनी आधीच सांगितला होत की, मोबाईल आपल्या आयुष्याचा भाग बनणार आहे. प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा होता तितकाच मोठा शोध AI चा आहे. गुगलने बारामतीत शेतीवर प्रयोग केले. त्यांनी शेतात AI चा वापर करण्यास सांगितले. शेतात AI चा वापर होऊ लागला आहे. वाऱ्याची दिशा, पिकावरील कीड, पिकाला किती पाणी हे मोबाईलवर समजणार आहे. एकरी शंभर टन ऊसाचे उत्पन्न होणार असल्याचे खांडेकर म्हणाले.
AI चे दुष्परिणाम देखील होणार
AIचे दुष्परिणाम देखील होणार आहेत. यामुळं नोकऱ्यावर परिमाण होणार आहे. माणसाची काम यंत्र करायला लागली तर परिस्थिती बदलणार असल्याचे राजीव खांडेकर म्हणाले.
पहिले उदाहरण
अर्जुन देशपांडे यांचा कट्टा पाहा ते 25 वर्षाचा आहे. त्याने जेनरिक औषधांचा काम सुरु केलं. अर्जुनने जेनरिक आधार नावाची कंपनी सुरु केली. रतन टाटाने याची बातमी वाचली त्यानंतर ते मेंटॉर बनले. त्यांची 1600 मेडिकल होती. त्याचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. स्ट्रॉंग आयडिया असल्यास हे शक्य असल्याचे खांडेकर म्हणाले.
दुसरे उदाहरण
संजू राठोड यांचे गुलाबी साडी गाण दोन वर्ष टॉप फिफ्टी मध्ये होतं. म्हशी घेऊन दूध विकायचं स्वप्न होतं सोबत गाण लिहायचं आणि म्हणायचं छंद होता. त्यांच्या भावने म्युझिक दिलं त्याच्या गाण्याला यूट्यूब कडून पैसे मिळाले. गुलाबी साडीचा चमत्कार. VT स्टेशनवर राहिलेला मुलगा गाणे गाऊ लागला. तुम्ही पॉझिटिव्हली विचार केला तर ते सार्थकी लागतं. त्याला अनंत अंबानींच्या लग्नाचा आमंत्रण मिळालं असे खांडेकर म्हणाले.
कॉम्प्युटर आल्यावर कम्प्युटरवरच्या कुंडल्या विकालायला सुरुवात झाली. आपण जसे मोबाईल वापरतो तसे जगात इतर लोक मोबाईल वापरत नाहीत. मला विदेशात मोबाईल वापरणारे लोक सापडले ते 90 टक्के भारतातले होते. मनोरंजन स्थायीभाव झालेला आहे. मज्जा करणं स्वभाव झालाय, सण कमी होते म्हणून मदर्स डे फादर डे आपण करत आहोत. मनाचं रंजन करण्यात आपण धन्यता मानत आहोत असे खांडेकर म्हणाले. मोबाईल बद्दल मुलांना शिकवण्यापेक्षा आई बापाला शिकवले पाहिजे. आपल्याकडे आईबाप होण्यासाठी कॉलिफिकेशन नाही. त्यामुळं अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अंबाजोगाईत हे प्रश्न कमी असतील अशी मी अपेक्षा करतो असे खांडेकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या





















