Horoscope Today 8 March 2026: आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
Horoscope Today 8 March 2026: आज रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 8 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 8 मार्च 2026, आजचा वार रविवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज जागतिक महिला दिन आहे. आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज मित्र परिवाराशी थोडे वाद होतील, त्यामुळे रागाचा पारा एकदम चढण्याची शक्यता आहे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मानसिक असलेली जाणवेल, एखाद्या गोष्टीचा लाभ मिळण्यासाठी कामांमध्ये अचानक बदल कराल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज हातून आर्थिक उलाढाली होतील, तुमचे संभाषण कौशल्य वापरून आपली मते इतरांना पटवून द्याल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज एकंदरीत संघर्षमय दिवस नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज वाणी जपून चालवा, ठरलेल्या कामाबद्दल शांतपणे बसून विचार करणे गरजेचे ठरेल
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज छोट्या छोट्या घातकी सवयी बदलल्या, तर भरपूर काम करू शकाल, भूतकाळातील अपयशात गुंतून पडलात तर प्रगती होणार नाही.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज महिलांनी त्यांचा दृष्टिकोन बदलावा, तरुणांचे विवाह ठरतील, पूर्वी केलेल्या आर्थिक नियोजन उपयोगी पडेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आर्थिक परिस्थिती सुधारेल, समोरच्या माणसाचा चढलेला पारा कसा खाली आणायचा याचे चातुर्य राहील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज इतरांची मने जिंकाल, परंतु क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे लक्षात ठेवायला लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज प्रवासाचे योग येतील, मित्रांबरोबर सहलीचे बेत ठरवाल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल, खाण्यावर मात्र बंधन ठेवायला हवे
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतल्यामुळे सौख्य मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
हेही वाचा>>
Shani Ast 2026: पैशाचं टेन्शन मिटणार 4 राशींचं! 13 मार्चचा शनि अस्त भाग्योदय करणार, संपत्तीचा मार्ग मोकळा, साडेसाती असणाऱ्यांची लॉटरीच!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















