आर्यनच्या जामीन प्रक्रियेला अद्याप सुरुवात नाही, Aryan Khan आज तुरुंगातून सुटणार की नाही?
Aryan Khan Bail : मुंबई क्रूझ ड्रग्ज (Mumbai Drug Case) प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानची अखेर 25 दिवसांनी जामीनावर सुटका झाली. परंतु, निकालाची प्रत आज मिळणार असल्यानं आर्यनला जामीन मिळाल्यानंतरही आणखी एक रात्र तुरुंगातच काढावी लागली. आर्यन खान आज तुरुंगाच्या बाहेर येण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात काल (गुरुवारी) पार पडलेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर केला. मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू माजी अटॉर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी मांडली. तर एनसीबीच्या वतीनंही जामीन फेटाळण्यासाठी जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अखेर आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाला जामीन मंजूर करण्यात आला.




















