Trigrahi Yog 2026 : 15 मार्चपासून सूर्याचा त्रिग्रही योग! 'या' 3 राशींवर पैशांचा पाऊस पडणार, मालामाल होण्याची मिळणार सुवर्णसंधी...
Trigrahi Yog 2026 : द्रिक पंचांगानुसार, 15 मार्च रोजी रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी 14 एप्रिल 2026 पर्यंत तो स्थित असेल.

Trigrahi Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य एका ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या पद्धतींनी पाहायला मिळतो. सूर्याला आत्मा. पिता, आरोग्य आणि मान-सन्मानाचा कारक ग्रह मानतात. सध्या सूर्य कुंभ राशीत विराजमान आहे. पण, 15 मार्चला सिंह राशी परिवर्तन करुन आपली मित्र राशी मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी शुक्र आणि शनिसह युती करुन त्रिग्रही (Trigrahi Yog 2026) आणि शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. सूर्याच्या त्रिग्रही योगामुळे काही राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
द्रिक पंचांगानुसार, 15 मार्च रोजी रात्री 1 वाजून 8 मिनिटांनी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. या ठिकाणी 14 एप्रिल 2026 पर्यंत तो स्थित असेल. या दरम्यान सूर्य, शुक्र आणि शनिसह संयोग बनवून त्रिग्रही योग निर्माण करणार आहे. याचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते पाहूयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी त्रिग्रही योग फार खास ठरणार आहे. या राशीच्या तिसऱ्या चरणाचा स्वामी ग्रह सूर्य दहाव्या स्थानी संक्रमण करणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये चांगली संधी मिळेल. तसेच, तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. शत्रूवर तुम्हाला विजय मिळवता येईल. तसेच, भौतिक सुख-शांती मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या नवव्या स्थानी सूर्याचं संक्रमण होणार आहे. सूर्य, शुक्र आणि शनिचा त्रिग्रही योग या राशीसाठी सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. या काळात तुमच्या नशिबाचे दार उघडतील. धनसंपत्तीची भरभराट पाहायला मिळेल. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या चतुर्थ स्थानी सूर्याचं संक्रमण होणार आहे. तसेच, या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. त्रिग्रही योग काही राशींना चांगला लाभ देणार आहे. तसेच, जर तुम्हाला या काळात नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Horoscope Today 7 March 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य



















