एक्स्प्लोर

Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात

सध्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताचे 16 सामन्यांत 9 विजय, 6 पराभव आणि एक बरोबरीत 110 गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 57.29 आहे. भारताला सध्या आणखी 3 सामने खेळायचे आहेत.

Team India WTC Points Table : दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गकेबरहा येथील सेंट जॉर्ज पार्क येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने 109 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेला सामना जिंकण्यासाठी 348 धावांचे लक्ष्य होते. पण त्यांचा संपूर्ण संघ सामन्याच्या पाचव्या दिवशी (9 डिसेंबर) दुसऱ्या डावात 238 धावांत गडगडला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातली.

दक्षिण आफ्रिका आता अव्वल स्थानावर

श्रीलंकेविरुद्धच्या या दणदणीत विजयानंतर दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC) मोठा फायदा झाला आहे. आफ्रिकन संघ आता WTC गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आहे. आता दक्षिण आफ्रिकेचे 10 सामन्यांत 6 विजय, 3 पराभव आणि एक बरोबरीत 76 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी 63.33 आहे, जी ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे 14 सामन्यांत 9 विजय, 4 पराभव आणि 1 अनिर्णित 102 गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 60.71 आहे. सध्या तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताचे 16 सामन्यांत 9 विजय, 6 पराभव आणि एक बरोबरीत 110 गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 57.29 आहे. भारताला सध्या आणखी 3 सामने खेळायचे आहेत, जे फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत.

या पराभवानंतरही श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर असला तरी अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. श्रीलंकेकडे 45.45 टक्के गुण आहेत आणि ते कमाल 53.85 टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतात. इंग्लंड पाचव्या तर न्यूझीलंड सहाव्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सातव्या, बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडिज नवव्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर आहेत.

आता भारतासाठी हे समीकरण

तसं पाहिलं तर दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीचा मार्ग आता सोपा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेला आता मायदेशात पाकिस्तानविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. आफ्रिकन संघाने या मालिकेत एक सामना जिंकला तर तो WTC फायनलमध्ये पोहोचेल. दुसरीकडे, भारतीय संघासाठी हे समीकरण अधिक कठीण झाले आहे. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 4-1अशी जिंकावी लागेल. म्हणजेच अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला उर्वरित तीन सामने जिंकावे लागतील, जेणेकरून 63.15 टक्के गुण गाठता येतील. मात्र, भारतीय संघ एकही कसोटी हरला तर गुणांची टक्केवारी 57.89 इतकी कमी होईल. अशा स्थितीत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव करावा, अशी आशा भारतीय संघाला करावी लागेल. श्रीलंकेला घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला 2-0 किंवा 1-0 ने पराभूत करणे आवश्यक आहे, अन्यथा दोन्ही कसोटी अनिर्णित राहतील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिसरी सायकल असून जी 2023 ते 2025 पर्यंत चालवली जाईल. आयसीसीने या तिसऱ्या सायकलसाठी पॉइंट सिस्टमशी संबंधित नियम आधीच जारी केले आहेत. कसोटी सामना जिंकल्यास संघाला 12 गुण, सामना अनिर्णित राहिल्यास 4 गुण आणि सामना बरोबरीत सुटल्यास 6 गुण मिळतील. त्याच वेळी, सामना जिंकण्यासाठी 100 टक्के, टायसाठी 50 टक्के, ड्रॉसाठी 33.33 टक्के आणि पराभवासाठी शून्य टक्के गुण जोडले जातात. दोन सामन्यांच्या मालिकेत एकूण 24 गुण उपलब्ध आहेत आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 60 गुण उपलब्ध आहेत. पॉइंट टेबलमधील रँकिंग प्रामुख्याने विजयाच्या टक्केवारीच्या आधारे निश्चित केली जाते. WTC च्या सध्याच्या सायकलचा अंतिम सामना पुढील वर्षी 11 ते 15 जून दरम्यान लॉर्ड्सवर खेळवला जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Embed widget