(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 3 PM : 22 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 3 PM : 22 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
राज्यातील आगामी विधान निवडणुकांचं बिगुल अद्याप वाजलं नसलं तरीदेखील सर्वच पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. अशातच महाराष्ट्रातील अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे चुरस पाहायला मिळणार आहे. तसं पाहायला गेलं तर यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात होणार यात काही शंकाच नाही. पण, विधानसभा निवडणुकांपूर्वीच महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी किमान चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री (Chief Minister) पदाच्या चेहऱ्यावरुन महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. 16 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या महाविकास आघाडीचा मेळावा पार पडलेला. यामध्ये बोलताना विधानसभा निवडणुकांपूर्वी (Vidha Sabha Election 2024) मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. तसेच, जे नाव जाहीर केलं जाईल, त्याला आपला पाठिंबा असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण ठाकरेंच्या या मागणीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं कोणतंही ठोस उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे किमान चार भिंतीच्या आड तरी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, अशी भूमिका ठाकरे गटानं घेतल्याचं कळतंय.