Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार
आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात हिवाळी अधिवेशनात भाजप आमदार
कृष्णा खोपडे विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहेत.. तुकाराम मुंढे नागपुरात महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी कोणतेही अधिकार नसताना आणि शासनाकडून त्यांची स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नेमणूक नसतानाही त्यांनी स्मार्ट सिटी चा प्रभार आपल्याकडे खेचून घेतला होता.. आणि स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी काही मर्जीतल्या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले होते.. असा आरोप खोपडेंनी केलाय. ..तसेच काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केली होती.. तेव्हा दोन्ही प्रकरणांचे एफ आय आर पोलिसांकडे दाखल झाले होते मात्र उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या दबावात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात आवश्यक कारवाई झाली नाही.. आता ते जुनं प्रकरण नव्याने पुन्हा समोर आणून भाजप आमदार कृष्णा खोपडे तुकाराम मुंडे यांच्या निलंबनाची मागणी करणार आहेत.























