Horoscope Today 7 March 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच साडेसातीतून मुक्तता, आजचे राशीभविष्य वाचा...
Horoscope Today 7 March 2026: आज शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 7 March 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 7 मार्च 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज महिला आवडत्या गोष्टीसाठी वेळ काढतील, प्रेम प्रकरणांमध्ये आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज व्यवसायात संधीचे सोने करणे तुमच्या हातात राहील, नवीन ओळखी होतील, पण अति विचारामुळे स्वतःचे नुकसान करून घ्याल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज आवश्यक त्यांना सहकार्याचा हात द्याल, नावलौकिक वाढेल, बौद्धिक कामे आवडतील
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज प्रसिद्धी मिळेल लेखकांना लिखाणात प्रगती करता येईल, करिअरमध्ये विचारांना स्थिरता दिली तर यश मिळवू शकाल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज थोडासा अशीपणा आणि लवकर निर्णय न घेतल्यामुळे नुकसान संभवते, उत्तम संधी मिळण्यासाठी कष्टाला पर्याय नाही
कन्या रास (Virgo Horocsope Today)
कन्या राशींच्या लोकांसाठी आज एखाद्या कामासाठी विलंब अडथळे यांचा सामना करावा लागेल, महिलांच्या गुणांची कदर न झाल्यामुळे त्या थोड्या नाराज होतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज साहित्य आणि सौंदर्य याबाबतीत तुमची कल्पनाशक्ती काम करेल, कर्तव्यापेक्षा भावनांना जास्त महत्त्व द्यावे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज प्रत्येक कामामध्ये अति संवेदनशीलता आणि नाजूक वृत्ती ठेवल्यामुळे इतरांना थोडी मुडी वाटाल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज तुमचे सातत्यपूर्ण प्रयत्न प्रत्येक आव्हानांना सामोरे जातील, काळ काम वेग याचे गणित जमवा
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या गुणांचा सदुपयोग करून घ्या, जोडीदाराचे मन राखावे लागेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज इतरांच्या गैरसमज दूर करावे लागतील, आर्थिक नियोजनांमध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता राहील
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज चैनीच्या वस्तूंच्या खरेदीचा मूड राहील, महिलांना कुटुंबात तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल.
हेही वाचा>>
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा गेम पालटणार! 3 राशींना मोठा धनलाभ, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















