LIVE BLOG | आज दिवसभरात... 28 डिसेंबर 2019
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. मालमत्ता कराबाबत धोरण निश्चित होईपर्यंत 500 चौरस फुटांच्या घरमालकांना मालमत्ता करमाफ, महापालिकेकडून मुंबईकरांना दिलासा
2. 10 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना 20 टक्क्यांऐवजी 10 टक्के आयकराची शिफारस, 2020 च्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
3. अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, पुणे राष्ट्रवादीकडून शपथविधीसाठी आज शुभेच्छांचा कार्यक्रम
4. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्ये घरवापसीसाठी इच्छुक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेंसोबत बैठक केल्याची चर्चा
5. डोकं ठिकाणावर आहे का? नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीला परवानगी नाकारल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, तर काँग्रेसकडून आज शांती मार्चचं आयोजन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
