Zero Hour Full : जास्तीत जास्त मराठा उमेदवारदेण्याचा फायदा मविआला होईल का?
Zero Hour Full : जास्तीत जास्त मराठा उमेदवारदेण्याचा फायदा मविआला होईल का?
मराठा म्हटलं कि डोळ्यासमोर नक्की कोण येतं? आधी चटकन डोळ्यासमोर नेत्यांची रीघ लागायची ... पण गेल्या एका वर्षांपासून मराठा म्हटलं कि मनोज जरांगे पाटील हि उभे राहतात ... राज्यात मराठा आरक्षणानंतर बरीच राजकीय समिकरण बदललीयेत .. त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष हि निर्माण झाला ...
आणि तो संघर्ष शांत होतोच आहे कि लोक सभा निवडणुका लागल्या ... आता याचा थेट परिणाम उमेदावरीवर झालाय का ? असा प्रश्न पडतोय.. कारण आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी. मविआकडून मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजातील उमेदवारांवर भर दिल्याचं दिसतंय..
भाजपकडून जुना माधव पॅटर्न.. म्हणजेच.. माळी-धनगर- वंजारी.. समाजाला उमेदवारी देऊन त्या मदतीने ओबीसी समाजाला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न सुरु असल्याची बातमी आम्हीच तुम्हाला झीरो अवरमध्ये दिली होती.
त्यामुळे कि काय, दुसरीकडे मविआकडून , मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय.. असं म्हणायला हरकत नाहीय.. कारण, महाविकास आघाडीने घोषीत केलेल्या ४५ उमेदावारांपैकी ३२ उमेदवार, म्हणजेच ७१% उमेदवार हे एकट्या सकल मराठा समाजाचे आहेत.