Surgana Gujrat Issue Special Report : 'आमची गावं गुजरात राज्यात समाविष्ट करा' गुजरात सरकारला निवेदन
गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील वासदा तहसील कार्यालयात धडकलेले हे आहेत नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधव. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चिंतामण गावित यांच्यां नेतृत्वाखाली सुरगाणा तालुका सीमा संघर्ष समिती स्थापन करण्यात आलीय. नाशिक जिल्हा आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्याचं शेवटचे टोक असल्यानं वीज,पाणी, रस्ते, आरोग्य शिक्षण आशा मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी उठाव केला. देशाच्या स्वतयंत्राचा अमृतमहोत्सव साजरा झाला तरीही मूलभूत सोयीसुविधासाठी आदिवासी पाड्यावरील बांधवाना झगडावं लागत आहे., राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आधी सुरगाणाच्या तहसीलदाराना निवेदन दिले मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली, मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी वासदा तालुक्यातील तहसील कार्यालय गाठलं, तहसीलदार यांनीही राज्य सरकाकडे पुढील कार्यवाहीसाठी निवेदन पाठविणार असल्याचे आश्वासन दिले