Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 02 जानेवारी 2024 : ABP Majha
संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना, आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या अध्यक्षतेखालील पथकाकडून होणार तपास. यामध्ये एकूण १० अधिकाऱ्यांचा समावेश.
संतोष देशमुख हत्याप्रकणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर ३०७ चा गुन्हा तर फरार कृष्णा आंधळेवरही धारूर पोलीस ठाण्यात ३०७ चा गुन्हा दाखल असल्याची सूत्रांची माहिती, याप्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत १३० जणांची चौकशी.
जळगावच्या पाळधी गावात झालेल्या दंगलीत सुमारे १३ दुकानांची जाळपोळ, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशींसह महसूल पथकाकडून नुकसानग्रस्त दुकानांचे पंचनामे सुरू.
२५ तारखेची लढाई अंतिम, मराठ्यांचा द्वेष नसेल तर सरकार पंचवीस तारखेआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मनोज जरांगेंचं वक्तव्य तर संतोष देशमुखांसाठी नांदेमध्ये मोर्चा काढण्याचंही केलं आवाहन.
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबारायाचं मनोज जरांगेंनी घेतलं दर्शन. मराठ्यांना आरक्षण मिळू दे, सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी असा आशीर्वाद खंडोबाकडे मागितल्याची जरांगेंची माहिती.
स्वातंत्र्याच्या साडेसात दशकांनंतर गडचिरोलीतील गर्देवाडा ते वांगेतुरी दरम्यानच्या 15 गावांना मिळाली बस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसचं उद्घाटन करीत बसमधून केला प्रवास
गडचिरोलीतील लोह खनिज प्रकल्पाच्या डीआरआय प्लांटचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, स्लरी पाईप लाईन, पेलेट प्लांट आणि लोह धातू गाईंडींग युनीटचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर, गट्टा-वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाची केली पाहणी तर विद्यार्थ्यांशीही साधला संवाद.
गडचिरोलीत फडणवीसांच्या उपस्थितीत ११ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, यामध्ये ३ पुरूष आणि ८ महिलांचा समावेश, आत्मसमर्पण केलेल्या सर्वांवर सुमारे १ कोटींहून अधिकचं बक्षिस.